अकोला जिल्ह्यातील कृषीनगर भागातील अंगावर काटा आणणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत आरोपी पती अमानुषपणे बायकोला मारहाण करताना दिसत आहे. यावेळी त्यांची मुलगी जीवाच्या आकांताने वडिलांना आईला मारू नका अशी विनवणी करतानाही ऐकायला मिळत आहे. त्यामुळे सोशल मीडियावर या आरोपी पतीविरोधात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

व्हिडीओत पत्नीला मारहाण करणाऱ्या नराधम पतीचं नाव मनिष कांबळे असं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही वर्षांपासून या पती-पत्नीत वाद सुरू आहेत. मनिषने पत्नीला अंधारात ठेवत दुसरं लग्नही केलं. यानंतर बुधवारी (२५ मे) दुपारी मनिषनं शुल्लक कारण पुढे करत पत्नीला अमानुषपणे मारहाण केली. पत्नीने आरोपी पतीवर जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे.

व्हिडीओ पाहा :

विशेष म्हणजे ही मारहाण होत असताना आजूबाजूला काही महिलाही उभ्या असल्याचं दिसत आहे. मात्र, पीडितेला मारहाणीतून वाचवण्यासाठी कोणीही पुढे आलं नाही.

हेही वाचा : “मुलांना नीट जेवण देत नाही, सांभाळत नाही”, पुण्यात पतीच्या बेदम मारहाणीत पत्नीचा मृत्यू

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पीडितेची मुलगी देखील आईला मारू नका, अशी विनवणी करीत होती. मात्र, आरोपीने पत्नीला मारहाण सुरूच ठेवली. काही वेळेने आरोपीने पीडितेला सोडलं. यानंतर पीडितेने आरोपी पतीविरोधात सिव्हील लाईन पोलिसांकडे तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपी मनीषला न्यायालयात हजर केले असता जिल्हा सत्र न्यायालयाने त्याला जामीन दिला आहे.