महाराष्ट्राच्या विधासनभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा दिवस शेतकऱ्यांनी वीज बिलांसंदर्भात सुरु केलेलं आंदोलन आणि सरकारने दिलेल्या आश्वासनांसंदर्भातील मुद्द्यावरुन गाजला. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका करताना अनेक मुद्दे मांडले. मात्र एकीकडे फडणवीस मोठ्या जोशाने भाषण करत महाविकास आघाडीवर टीका करत असतानाच दुसरीकडे त्यांच्या मागील बाकावर बसलेले भाजपाचे नेते गिरीश महाजन यांचा मात्र सभागृहाचं कामकाज सुरु असतानाच डोळा लागला. फडणवीस भाषण देतानाच महाजन हे सभाग़हात डुलक्या काढताना दिसले. हा संपूर्ण प्रकार विधानसभेच्या लाइव्ह टेलिकास्टदरम्यान कॅमेरात कैद झालाय.

नक्की वाचा >> विधानसभेतील गिरीश महाजनांच्या डुलकीवर काँग्रेसची प्रतिक्रिया; लोकप्रिय चित्रपटातील सीनशी तुलना करत म्हणाले…

झालं असं की, दुपारी १२ वाजून ३७ मिनिटांनी फडणवीस हे राज्यातील एका प्रकरणासंदर्भात बोलताना एका अधिकाऱ्याने सरकारी कार्यालयामध्ये गोळीबार केला असं सांगत होते. नंतर हा गोळीबार कौटुंबिक कारणातून झाल्याचं सांगण्यात आल्याचं फडणवीस हातातील कागदांवरील मजकुराचा संदर्भ देत म्हणाले. 

नक्की वाचा >> देवेंद्र फडणवीस हे बाळासाहेबांनंतरचे खरे हिंदुहृदयसम्राट : नितेश राणे

फडणवीस या प्रकरणावरुन सरकारला प्रश्न विचारत असतानाच दुसरीकडे त्यांच्या मागील बाकावर बसलेल्या गिरीश महाजन यांचा डोळा लागला. एकदा त्यांनी डुलकीही मारली. नंतर आशिष शेलार यांनी त्यांच्या दंडावर कोपर मारुन त्यांना उठवलं. विशेष म्हणजे झोप मोड होताच महाजन यांनी थेट हात वर करत गोळीबार गोळीबार करत फडणवीसांच्या भाषणातील मुद्दा पुढे रेटला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरतोय.