भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर खालच्या पातळीवर टीका केली होती. ‘अजित पवार लबाड लांडग्याचं लबाड पिल्लू आहेत. अजित पवारांना आम्ही मानत नाही,’ असं विधान गोपीचंद पडळकर यांनी केलं होतं. या वक्तव्यानंतर गोपीचंद पडळकर यांच्यावर अजित पवारांच्या गटाकडून टीकास्र सोडण्यात येत आहे. राज्यात पडळकरांविरोधात आंदोलनही करण्यात आली आहेत. यावर आता विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले, “पडळकरांसारखी चिल्लर व्यक्ती अजित पवार यांना लांडगा म्हणत असेल, तर ते काय आहेत, हे दाखवून देण्याची वेळ आली आहे. अशा लोकांना चिरडण्याची भूमिका ते घेतील. तेव्हा अजित पवार वाघ, सिंह आणि हत्ती आहेत, हे दाखवून देतील.”

हेही वाचा : “फोडाफोडीचं राजकारण करणाऱ्यांना गणरायाने सुबुद्धी द्यावी”, जयंत पाटलांच्या विधानावर फडणवीस प्रत्युत्तर देत म्हणाले…

“पडळकरांचं वक्तव्य अयोग्य”

पडळकरांच्या विधानावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही भाष्य केलं आहे. “गोपीचंद पडळकर यांचं वक्तव्य अयोग्य आहे. अशाप्रकराची विधानं करणं चुकीची आहेत. तिन्ही पक्षातील कार्यकर्त्यांनी आणि आमदारांनी नेत्यांचा सन्मान ठेवला पाहिजे. याप्रकारच्या भाषेचा वापर करू नये,” असं मत देवेंद्र फडणवीसांनी मांडलं आहे.

हेही वाचा : “काँग्रेसचे नेते संभ्रम निर्माण करत आहेत”, बावनकुळे म्हणाले, “ओबीसींचे आरक्षण…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गोपीचंद पडळकर काय म्हणाले होते?

“धनगर समाजाबद्दल अजित पवार यांची भावना स्वच्छ नाही. म्हणून धनगर आरक्षणाबाबत अजित पवार यांना पत्र देण्याची गरज नाही. अजित पवार लबाड लांडग्याचं लबाड पिल्लू आहेत. अजित पवारांना आम्ही मानत नाही आणि कधी पत्रही दिलं नाही. पुढेही देण्याची आवश्यकता वाटत नाही. त्यामुळे ज्यांच्याकडून आम्हाला न्याय मिळू शकतो, अशा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र दिलं आहे,” असं गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं.