शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळेंनी शिवसेना आमदार आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप केले होते. अभिनेता सुशांतसिंह राजपूतचा मृत्यूपूर्वी रिया चक्रवर्तीला ‘AU’ नावाने ४४ फोन करण्यात आले. ‘AU’ म्हणजे आदित्य उद्धव ठाकरे, असं राहुल शेवाळेंनी लोकसभेत सांगत चौकशीची मागणी केली होती. त्यानंतर भाजपा आणि शिंदे गटाच्या आमदारांनी आदित्य ठाकरेंना लक्ष्य केलं होतं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भाजपाचे आमदार नितेश राणेंनी सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणात आदित्य ठाकरेंच्या नार्को टेस्टची मागणी केली होती. “A फॉर आफताब पूनावाला आणि A फॉर आदित्य ठाकरे, सगळ्या विकृतींचं नाव एकच. श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात आफताब पूनावालाची नार्को टेस्ट करण्यात आली. तसेच, आदित्य ठाकरेंची नार्को टेस्ट करण्यात यावी. सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणातील सत्य समोर येईल,” असं नितेश राणेंनी म्हटलं होतं.

हेही वाचा : छत्रपती संभाजी महाराज स्वराज्यरक्षक की धर्मवीर?, अमोल कोल्हेंनी मांडली भूमिका; म्हणाले…

यावरून शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार विनायक राऊत यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणेंवर खळबळजनक आरोप केले आहेत. “आदित्य ठाकरेंवर नितेश राणे तोंडसुख घेत आहेत. पण, नारायण राणेंची कारकिर्द नितेश राणेंनी आठवावी. सख्ख्या चुलत भावाचं घराच्या समोर डोक फोडलं. नंतर गाडीत घालून नांदगावात नेत जाळून टाकलं. नारायण राणेंच्या कारकिर्दीत जेवढे लोक बेपत्ता आणि खून झाले, याची एसआयटी चौकशी करावी. तसेच, नारायण राणेंची नार्कोटेस्ट करा म्हणजे खूनांना वाचा फुटेल. तसेच, कळेल की कोण खूनी आहेत आणि कोणाचा रक्तरंजित इतिहास आहे,” असं विनायक राऊत म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vinayak raut criticized narayan rane over nitesh rane demand aaditya thackeray narco test ssa
First published on: 03-01-2023 at 17:06 IST