मागील काही दिवसांमध्ये राज्यात येणारे अनेक उद्योग गुजरातसह अन्य राज्यांत गेले. महाराष्ट्रात होणारी कोट्यवधींची गुंतवणूक परराज्यात गेली. याच मुद्द्यावरून मागील काही दिवसांपासून आरोप प्रत्यारोप होत आहेत. हा वाद मागे पडलेला असतानाच राज्यातून एक-दोन उद्योग बाहेर गेल्यास काहीही नुकसान होणार नाही, असे विधान मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले आहे. राज ठाकरे यांच्या याच विधानानंतर आता राजकीय वर्तुळातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. राज ठाकरेंच्या विधानावर बोलताना ठाकरे गटातील नेते विनायक राऊत यांनी राज ठाकरे सुपारी घेऊन बोलतात, अशी खोचक टीका केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> “एक-दोन उद्योग गेल्यानं राज्याचं नुकसान होणार नाही” राज ठाकरेंच्या विधानावर अजित पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले, “मग मुलांनी…”

“राज ठाकरे यांनी सुपारी घेऊन बोलायचा धंदा सुरू केला आहे. राज्यातून दोन नव्हे तर पाच मोठे प्रकल्प गुजरात आणि दिल्लीमध्ये गेले आहेत. त्या प्रकल्पांच्या जोरावरच मोदी यांनी गुजरातची निवडणूक जिंकली आहे. महाराष्ट्र कंगाल केला आणि गुजरातचं भलं केलं आहे. राज ठाकरे याकडे गांभीर्याने पाहात नाहीत हे मनसेचे दुर्दैव आहे,” असे विनायक राऊत म्हणाले.

हेही वाचा >>> Video : कडाक्याच्या थंडीत काँग्रेस कार्यकर्त्यांच्या दंडबैठका! राहुल गांधींवर टीशर्टवरून टीका करणाऱ्यांना उत्तर

काय म्हणाले राज ठाकरे?

“महाराष्ट्र हा सर्वार्थाने श्रीमंत आहे. महाराष्ट्राचं काय होणार? असा टाहो आपण उगाच फोडत असतो. आपल्याकडे जे आहे, ते जरी टीकवलं तरी महाराष्ट्र सर्वांच्या पुढे आहे. राज्यातून एक-दोन उद्योग बाहेर गेल्याने महाराष्ट्राचं काहीही नुकसान होणार नाही. मात्र, आपण महाराष्ट्र जोपसणं गरजेचं आहे. प्रत्येकाने या गोष्टीकडे नीट बघणं आवश्यक आहे”, असं राज ठाकरे म्हणाले होते.

हेही वाचा >>> “सगळे घाव झेलायला ताई आणि मलाई खायला…”, पंकजा मुंडेंबाबत प्रीतम मुंडेंचं मोठं विधान!

दरम्यान, राज ठाकरे यांच्या विधानावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीदेखील प्रतिक्रिया दिली आहे. “राज्यातून गेलेल्या प्रकल्पावरून राजकीय व्यक्ती समर्थन करत असेल तर दुर्दैव आहे. प्रत्येक प्रकल्प महाराष्ट्रात येण्यासाठी सर्व राज्यकर्त्यांनी प्रयत्न केला पाहिजे. त्यामुळे आर्थिक सुबत्तता निर्माण होऊन तेथील भागात रोजगार निर्माण होतील,” असे अजित पवार म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vinayak raut criticizes raj thackeray for supporting industry going out of maharashtra prd
First published on: 08-01-2023 at 19:03 IST