तेरा वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी चंद्रपूर जिल्ह्यातील एका आश्रमशाळेचे अधीक्षक संजय एकनाथ इटनकर यास अटक करण्यात आली.

पिडीतेचे पालक चंद्रपूर जिल्ह्यातील रहिवासी असून काही महिन्यांपूर्वी हिंगणघाट शहरात राहायला आलेत. त्यांनी आपल्या मुलीला चंद्रपूर जिल्ह्यातील एक निवासी आश्रमशाळेत शिकण्यासाठी पाठवले होते. दरम्यान, मुलीची प्रकृती ठीक नसल्याचे कारण देत शाळा प्रशासनाने तिला परत घेऊन जाण्याची सूचना पालकांना केली. त्यानुसार मुलीला घेऊन पालक त्याच दिवशी हिंगणघाटला आले. घरी आल्यावर प्रकृतीची विचारपूस केली असता मुलीने आपल्यासोबत घडलेला अनुचित प्रकार कथन केला. यानंतर पालकांनी मुलीला उपजिल्हा रुग्णालयात नेले. वैद्यकीय तपासणी झाली. त्यात मुलीवर अत्याचार झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर हिंगणघाट पोलिसांनी ३७६ व पोक्सो अंतर्गत गुन्हे दाखल करीत इटनकर यास अटक केली.

pune crime news, pune koyta gang marathi news, pune school boy koyta attack marathi news
पुणे : शाळकरी मुलावर कोयत्याने वार; अल्पवयीन मुलांसह साथीदारांवर गुन्हा
article about conspiracy to defame the judiciary constitution protection by judiciary
लेख : न्यायपालिकेच्या बदनामीचे षड्यंत्र!
Death threat to Deputy Chief Minister devendra Fadnavis on social media case filed in Santacruz police station
उपमुख्यमंत्री फडणवीस यांना समाज माध्यमांवर ठार मारण्याची धमकी, सांताक्रुझ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
share market akola
सावधान! शेयर मार्केटमधून नफ्याचे आमिष; वृद्ध डॉक्टरची ६४.५० लाखांनी फसवणूक

दरम्यान, आमदार समीर कुणावार यांनी ही घटना दुर्दैवी असल्याचे सांगितले. पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी तसेच सदर आश्रमशाळेची मान्यता रद्द करावी म्हणून पाठपुरावा करणार असल्याचे कुणावार म्हणाले. दरम्यान, आरोपीस अटक करून चंद्रपूर पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आले आहे.

भद्रावती तालुक्यातील बरांज तांडा येथील गमाबाई निवासी आश्रम शाळेची ही विद्यार्थिनी आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते तुकाराम पवार अध्यक्ष असलेल्या संस्थेच्या वतीने संचालित ही शाळा आहे. कोरपना व जिवती तालुक्यातदेखील पवार यांच्या आश्रमशाळा, महाविद्यालय व हायस्कूल आहेत. सर्वप्रथम हे प्रकरण भद्रावती पोलीस ठाण्यात गेले होते. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात न घेता संस्थाचालक हे प्रकरण उघडकीस येऊ नये यासाठी प्रयत्नरत होते. परंतु, हिंगणघाट पोलिसांनी अधीक्षक इटनकर याला अटक करताच खळबळ उडाली आहे.