काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेची आज मुंबईत सांगता करण्यात आली. यावेळी त्यांनी मुंबईत भव्य जाहीर सभाही घेतली. दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कातून त्यांनी मुंबईतील जनतेशी संवाद साधला. यावेळी इंडिया आघाडीचेही काही नेते उपस्थित होते. यावेळी त्यांनी इंडिया आघाडी कोणाविरोधात लढत आहे, हे स्पष्ट केलं.

राहुल गांधी म्हणाले, आम्ही सर्व मोदींविरोधात लढत आहोत, असं म्हटलं जातंय. पण आम्ही एकाही व्यक्तीच्या विरोधात लढत नाहीत. आम्ही भाजपा किंवा कोणत्याही व्यक्तीच्या विरोधात नाहीत. परंतु, एका व्यक्तीचा चेहरा तयार करून ठेवला आहे. हिंदू धर्मात शक्ती शब्द आहे. आम्ही या शक्तीविरोधात लढत आहोत.”

हेही वाचा >> ‘महाराष्ट्र सरकारमध्ये लीडर नाही, तर डिलर बसले’, बिहारचे नेते तेजस्वी यादव यांची टीका

“आता प्रश्न निर्माण होतो की ती शक्ती कोणती आहे? राजाचा आत्मा ईव्हीएममध्ये आहे, हे खरं आहे. राजाचा आत्मा ईव्हीएममध्ये आहे, हिंदुस्तानच्या प्रत्येक संस्थेत आहे, ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स विभागात आहे. एका वरिष्ठ नेत्याने काँग्रेसला सोडलं. त्यांनी रडत माझ्या आईला सांगितलं की, ‘सोनियाजी मला लाज वाटतेय. माझ्यात या लोकांविरोधात, या शक्तीविरोधात लढण्याची हिंमत नाही. मी तुरुंगात जाऊ इच्छित नाही.’ असे एक नाही, असे हजारो लोक घाबरवले गेले आहेत. शिवसेनेचे लोक, एनसीपीचे लोक असेच गेले. या शक्तीने त्यांचा गळा पकडून त्यांना भाजपात पाठवलं आहे. हे सगळे घाबरून गेले आहेत”, असा आरोपही त्यांनी केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ईव्हीएमशिवाय मोदी जिंकणार नाहीत

“ही खरी शक्ती आहे जी देशाला चालवत आहे. यातून कोणीच वाचणार नाही. इव्हीएमबाबत कोणीतरी बोललं. मी तु्म्हाला सांगतो की इव्हीएमशिवाय मोदी निवडणूक जिंकू शकत नाही. निवडणूक आयोगाला आम्ही सांगितलं की विरोधी पक्षाला हे मशिन दाखवा. खोलून दाखवा. हे कसं चालतं आमच्या एक्स्पर्टला दाखवा. पण त्यांनी दाखवलं नाही. मतं मशिनमध्ये नाही. मतं कागदात आहे. तुम्ही मशिन चालवा, पण कागदाचीही मोजणी करा. पण ते म्हणतात कागदाची मोजणी करणार नाही. सिस्टमला ही मोजणी नकोय”, अशीही टीका त्यांनी केली.