चैत्राच्या प्रारंभीच वैशाख वणव्याची जाणीव करून देणारा सांगलीतील उष्णतेचा पारा ३९ अंशांवर पोहोचला असून दुपारच्या वेळी रस्ते ओस पडू लागले आहेत. ढगाळ हवामान असल्यामुळे उन्हाचा चटका बसत नसला, तरी उकाडय़ाने नागरिक हैराण झाले आहेत.
गेल्या दोन दिवसांपासून तीव्र उन्हाळ्याच्या झळा सांगलीकरांना बसत आहेत. यामुळे व्यापारपेठेतील बहुसंख्य दुकाने ग्राहकाच्या प्रतीक्षेत राहत असून थंड पेय विक्रेत्यांची दुकाने ओसंडून वाहत आहेत. थंड पेय, सरबत विक्रेत्यांना हा उन्हाळा पर्वणी साधत असला, तरी उन्हाळ्यामुळे लोक घराबाहेर पडण्यास नाखूश आहेत. याचा परिणाम बाजारपेठांवरही झाला असून काही दुकाने दुपारी १ नंतर सायंकाळी ५ वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येत आहेत. अद्याप वैशाख महिना सुरू व्हायचा असून तोपर्यंत आणखी उष्णतामान वाढणार आहे. सध्या सांगलीचे तापमान ३९ अंशांवर पोहचले असून रात्री हे तापमान ३० अंशांपर्यंतच खाली येत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सांगलीचा पारा

३९ अंशांवर

वार्ताहर,सांगली

चत्राच्या प्रारंभीच वैशाख वणव्याची जाणीव करून देणारा सांगलीतील उष्णतेचा पारा ३९ अंशांवर पोहोचला असून दुपारच्या वेळी रस्ते ओस पडू लागले आहेत. ढगाळ हवामान असल्यामुळे उन्हाचा चटका बसत नसला, तरी उकाडय़ाने नागरिक हैराण झाले आहेत.

गेल्या दोन दिवसांपासून तीव्र उन्हाळ्याच्या झळा सांगलीकरांना बसत आहेत. यामुळे व्यापारपेठेतील बहुसंख्य दुकाने ग्राहकाच्या प्रतीक्षेत राहत असून थंड पेय विक्रेत्यांची दुकाने ओसंडून वाहत आहेत. थंड पेय, सरबत विक्रेत्यांना हा उन्हाळा पर्वणी साधत असला, तरी उन्हाळ्यामुळे लोक घराबाहेर पडण्यास नाखूश आहेत. याचा परिणाम बाजारपेठांवरही झाला असून काही दुकाने दुपारी १ नंतर सायंकाळी ५ वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येत आहेत. अद्याप वैशाख महिना सुरू व्हायचा असून तोपर्यंत आणखी उष्णतामान वाढणार आहे. सध्या सांगलीचे तापमान ३९ अंशांवर पोहचले असून रात्री हे तापमान ३० अंशांपर्यंतच खाली येत आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Weather on 39 degrees in sangli
First published on: 02-04-2014 at 03:55 IST