उद्धव ठाकरे हा महाफडतूस माणूस आहे असं म्हणत नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. उद्धव ठाकरे फक्त शिव्या देण्याचं काम करू शकतो बाकी काहीही नाही असंही नारायण राणे यांनी म्हटलं आहे. आव्हान देण्याचं काम करू नका, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगाच्या पाठीवर नाव लौकिक मिळवला. ९ वर्षात भारत पाचव्या क्रमांकावर घेऊन गेले. आज उद्धवने त्याचं काम आहे का? सांग असं खुलं आव्हानही नारायण राणेंनी दिलं.
उद्धव ठाकरेंचं काम सदैव रडण्याचंच
काही राज्यांमध्ये अशी पद्धत आहे की घरात माणूस गेला की रडायला माणसं बोलवतात. रूदाली असं त्यांना संबोधलं जातं. त्यांना कशाचंही सोयर-सुतक नसतं. पैसे मिळाले की ते रडतात. उद्धव ठाकरे हा तसलाच माणूस आहे. कुणाचंही काही झालं की तिथे पळायचं, पत्नीला आणि मुलाला घेऊन आणि लागतो रडायला. आज एक संत तुकारामांच्या गाथेतली ओळ तुम्हाला वाचून दाखवतो, ‘मोले घातले रडाया । नाही असूं आणि माया ।।’ याचा अर्थ असा आहे की अडीच वर्षात भरपूर मोल कमावलं आहे आता रडायचं काम बाकी आहे. त्या आसवांमध्ये मायाही नाही प्रेमही नाही. असा हा उद्धव ठाकरे आहे असंही नारायण राणेंनी म्हटलं आहे.
संत तुकारामांना माहित नसावं की असा माणूस
संत तुकारामांना माहिती होतं का माहित नाही की मी लिहितोय असा माणूस जन्माला येईल आणि या ओळी त्याला चपखल बसतील. आता उद्धव ठाकरेचं भवितव्य काहीही नाही. या राज्यात तरी नाही. तू मुख्यमंत्री होतास ना? तेव्हा मुळापासून गुंडगिरी का उखडून टाकली नाही? होते शिवसैनिक एकनाथ शिंदे होते, नारायण राणे होते पण ते तुला भारी पडले ना? आमचे देवेंद्र फडणवीस सगळी जबाबदारी व्यवस्थित पार पाडत आहेत. मातोश्री क्रमांक एक आणि दोन हे १०० टक्के अधिकृत आहे का? त्यातला बेकायदेशीर भाग किती आहे? असाही प्रश्न नारायण राणे यांनी म्हटलं आहे.