सांगली : महायुतीतील भाजपने आपला उमेदवार जाहीर केला. मात्र, महाविकास आघाडीत सांगलीची जागा नेमकी कोणाकडे यावरून चर्चाच सुरू आहे. लोकसभेच्या आखाड्यात भाजप विरोधी पैलवान कोण हेच ठरत नसल्याने मतदारही संभ्रमात असल्याचे आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले.

मिरजेत माध्यम प्रतिनिधींशी बोलताना आमदार पडळकर यांनी महाविकास आघाडीतील घटक पक्षांची खिल्ली उडवली. भारतीय जनता पार्टीमध्ये आत एक बाहेर एक असे काही नसते. त्यामुळे भाजपचे उमेदवार खासदार पाटील यांच्या बरोबर आम्ही सगळे जोरात प्रचाराच्या कामात व्यस्त झालो आहे.

हेही वाचा – नीट, एमएचटी-सीईटी एकाच दिवशी, सीईटी सेलवर दोनच दिवसांत पुन्हा वेळापत्रक बदलण्याची वेळ!

हेही वाचा – सोलापूर : माढ्यात भाजपचा उमेदवार बदलण्यासाठी शिवसेनेचाही दबाव

हेही वाचा – राज्यातील तीन महत्त्वाकांक्षी प्रकल्पांच्या कामास आचारसंहितेनंतरच सुरुवात? एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात निविदा खुल्या होणार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विरोधक मैदानात उतरणार हे जरी सांगितले जात असले तरी मविआमधून ठाकरे शिवसेनेने जाहीर केलेली उमेदवारी काँग्रेसला मान्य नाही. काँग्रेसचे नेते म्हणतात आमच्याच पक्षाला उमेदवारी मिळणार. मात्र, याबाबतची स्पष्टता अद्याप होत नाही. यामुळे जसे नेते संभ्रमात आहेत तसे मतदारही संभ्रमात आहेत. याचा फायदा भाजपला निश्‍चित होणार आहे. महायुतीतील घटक पक्ष एकमेकांना सोबत घेऊन निवडणुकीला सामोरे जात आहेत. उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर खर्‍या अर्थाने निवडणुकीला रंगत येईल असेही ते म्हणाले.