अजित पवार यांच्याविषयीच्या अनेक बातम्या गेल्या काही दिवसांमध्ये सुरू होत्या. अजित पवार प्रकृतीच्या कारणामुळे नॉट रिचेबल झाले होते तरीही त्यांच्याविषयी चर्चा सुरू झाल्या. अजित पवार हे या कालावधीत दिल्लीला जाऊन आले अशाही चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या. या सगळ्या बाबत भाष्य करत असताना अजित पवार यांनी आम्ही आता गेंड्याच्या कातडीचे झालो आहोत असं वक्तव्य केलं आहे.

काय म्हटलं आहे अजित पवार यांनी?

“अलिकडे राजकारणाने एक वेगळ्या प्रकारची पातळी गाठली आहे. प्रत्येकाला एक खासगी आयुष्य असतं. त्यामुळे हे जे काही केलं जातं त्याची आम्हाला सवय झाली आहे. आम्ही आता गेंड्याच्या कातडीचे झालो आहोत. काय करता आता? सारखं तेच तेच तेच. नॉट रिचेबल झालो होतो त्यादिवशी मी आधी कार्यक्रमांना उपस्थित होतो. पण मला पित्ताचा त्रास व्हायला लागला म्हणून पुढचे सगळे कार्यक्रम रद्द केले. जागरण आणि अवेळी जेवणाने जो त्रास होतो तसा बऱ्याच वर्षांनी मला तो त्रास झाला. नेमका तो त्याच दिवशी का झाला माहित नाही पण झाला. आता शेवटी प्रकृती आहे. त्यामुळे घरी गेलो आणि झोपलो होतो.”

माझ्या विचाराचे म्हणजे राष्ट्रवादीच्या विचारांचे

“दुसऱ्या दिवशी पेपरमध्येच वाचलं, अजित पवारांचे पुढचे दोन दिवसांचे कार्यक्रम रद्द. अरे म्हटलं हे कुणी सांगितलं? त्यानंतर रांका ज्वेलर्सचं उद्घाटन केलं. अजून एक वकील होते तिथे वडगाव शेरीमध्ये गेलो. त्यानंतर पुढचे सगळे कार्यक्रम होते तिथे मी गेलो. तरी बातम्या चालल्या आहेत. का एवढं माझ्यावर प्रेम उतू चाललं आहे? त्यापेक्षा माझ्या विचारांचे आमदार निवडून द्या तिथे प्रेम उतू जाऊ द्या. माझ्या विचारांचे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विचारांचे. नाहीतर परत त्यावरूनही बातमी होईल. अजित पवार बोलताना माझ्या विचारांचे आमदार निवडून द्या म्हणाले असं म्हटलं जाईल.” असं अजित पवार यांनी म्हणताच एकच हशा पिकला. ‘सकाळ’ दिलेल्या मुलाखतीत अजित पवार यांनी हे भाष्य केलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अजित पवारांनी पाहिलेला शेवटचा सिनेमा कुठला?

शेवटचा सिनेमा मी बघितला.. दीपिका पदुकोण आणि शाहरुखचा पठाण. मला लॅपटॉपमध्ये एकाने सांगितलं की तीन तास तुमच्याकडे आहेत तर लॅपटॉपवर लावून दिला आणि पाहिला. भगवे बिकिनी वगैरे सगळं पाहिलं असंही अजित पवार म्हणाले.