सांगली : कुपवाडमधील खासगी शाळेत चौथ्या मजल्यावरून उडी मारून अकरावीत शिकणार्‍या मुलीने आत्महत्या करण्याचा प्रकार मंगळवारी सायंकाळी घडल्यानंतर त्याच शाळेत अकरावीमध्ये शिक्षण घेणार्‍या मुलाने बुधवारी सकाळी राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या करण्याचा प्रकार घडला. दोघांच्या आत्महत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी पोलीस सर्व बाजूंनी तपास करीत आहेत.

याबाबत माहिती अशी की साक्षी रविंद्र जाधव (वय १७ रा. मिरज) या मुलीने शाळेच्या चौथ्या माळ्यावरून उडी मारण्याचा प्रकार मंगळवारी शाळा सुटल्यानंतर घडला. यावेळी तिचे पालकही शाळेत आले होते. उडी मारल्यानंतर तिला तात्काळ खासगी रूग्णालयात उपचारासाठी शाळा व्यवस्थापनाने पालकांच्या मदतीने दाखल केले. मात्र, उपचार सुरू असतानाच तिचा मृत्यू झाला. याबाबत कुपवाड औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत अशी नोंद करण्यात आली आहे.

Goa Police
आईने कडक उपवास करायला लावल्याने दोन भावांचा मृत्यू? दिवसाला केवळ एक खजूर खायचे; गोव्यातील खळबळजनक घटना
Five cases filed against extortionist Vaibhav Deore three crore extortion from BJP office-bearer
खंडणीखोर वैभव देवरेविरुध्द पाच गुन्हे दाखल, भाजप पदाधिकाऱ्याकडून तीन कोटी खंडणी
Police raid on Dancers obscene dance in bungalow at lonawala
लोणावळा: बंगल्यात सुरू होता नृत्यांगनाचा अश्लील नाच; पोलिसांनी टाकला छापा
Mentally retarded girl pregnant from sexual abuse crime was solved with the efforts of Bharosa Cell
लैंगिक अत्याचारातून मतीमंद मुलगी गर्भवती; भरोसा सेलच्या प्रयत्नाने उलगडला गुन्हा

आणखी वाचा-“…तर तुमचं दूध, धान्य, भाजीपाला बंद करू”, मनोज जरांगेंचा शिंदे-फडणवीस सरकारला मोठा इशारा

या घटनेबाबत ठाणा प्रभारी सहायक निरीक्षक अविनाश पाटील यांनी सांगितले, मुलगी शाळा सुटल्यानंतर दप्तर घेउन बसमध्ये गेली होती. याच दरम्यान, तिचे पालक तिच्यासंबंधी शिक्षकांना विचारणा करण्यासाठी शाळेच्या आवारात आले होते. या दरम्यान, तिने बसमधून परत शाळेच्या चौथ्या माळयावर जाऊन खाली उडी मारली.

दरम्यान, या घटनेला २४ तास होण्यापूर्वीच प्रथमेश हणंमत पाटील (रा. सुभाषनगर, मिरज) या मुलानेही राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. हा मुलगाही याच शाळेत अकरावी विज्ञान विभागात शिक्षण घेत होता. या दोन्ही अल्पवयीन मुलांच्या आत्महत्येमागे समान धागा आहे का याचा तपास पोलीस करत आहेत.