सांगली : महिला शेतकऱ्यांनी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये अद्ययावत ज्ञान व माहिती घेऊन उसाचे विक्रमी उत्पादन घेण्यास हातभार लावावा यासाठी राजारामबापू सहकारी साखर कारखान्याच्या वतीने कार्यक्षेत्रातील १४ महिला शेतकरी रवाना झाल्या.
शेती समितीचे अध्यक्ष विठ्ठल पाटील यांनी या महिलांना निरोप दिला. यावेळी ऊस विकास समितीचे अध्यक्ष अमरसिंह साळुंखे, कार्यकारी संचालक आर. डी. माहुली, सचिव डी.एम. पाटील, मुख्य शेती अधिकारी प्रशांत पाटील, ऊस पुरवठा अधिकारी नितीन पाटील, संग्राम पाटील प्रामुख्याने उपस्थित होते.
इस्लामपूरच्या अर्चना जाधव, कमल ठोंबरे, लवणमाचीच्या जयश्री कदम, किल्ले मच्छिंद्रगडच्या वनिता मोहिते, आष्टाच्या अलका पाटील, बागणीच्या परबीन वठारे, कुरळपच्या वंदना जाधव, भवानीनगरच्या आशालता सावंत, कासेगावच्या सुजाता तोडकर, सुनंदा शिणगारे, वाळव्याच्या सुनीता कोले, ताकारीच्या नयना पाटील, कारंदवाडीच्या शैलजा पाटील, माळवाडीच्या प्रमोदनी व्हसुकले या महिला शेतकऱ्यांना चार दिवसांच्या अद्ययावत प्रशिक्षणास पुण्यास पाठविण्यात आले. कामगार संघटनेचे कार्याध्यक्ष तानाजीराव खराडे, वाहन विभागप्रमुख सुनील जाधव, अनिलकुमार पाटील, कामगार कल्याण अधिकारी महेश पाटील आदी यावेळी उपस्थित होते.