मणिपूरमध्ये हिंसाचार सुरू असतानाच दोन महिलांना विवस्त्र करत त्यांची रस्त्यावरून धिंड काढल्याच्या घटनेने देशात खळबळ उडाली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर देशभरातून संतप्त प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. खरंतर, ही घटना दोन महिन्यांपूर्वीची आहे, परंतु मणिपूरमधील पोलीस प्रशासनाने याप्रकरणी कोणतीही ठोस कारवाई केली नव्हती. अशातच या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे देशभरात संतापाची लाट उसळली. यावर सर्वोच्च न्यायालयानेही संताप व्यक्त केला.

या घटनेचा व्हिडीओ समोर आल्यावर सर्वोच्च न्यायालयाने दखल घेत मणिपूर सरकारला गुन्हेगारांवर तातडीने कारवाई करा, अन्यथा आम्हाला कारवाई करावी लागेल, असा निर्वाणीचा इशारा दिला. लोकांचा संताप आणि सरन्यायाधीशांनी खडसावल्यानंतर मणिपूरमधील प्रशासकीय यंत्रणा जागी झाली. याप्रकरणी तपासही सुरू झाला. परंतु, सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या या भूमिकेवर भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी आक्षेप घेतला. त्यामुळे आता भातखळकर यांच्यावर टीका होत आहे.

Patanjali
“जाहिरातींच्या आकाराएवढा माफीनामा छापला का?” रामदेव बाबांना SC ने फटकारले; न्यायमूर्ती म्हणाल्या “मायक्रोस्कोप घेऊन…”
ayesha jhulka, High Court, Pet Dogs Killing, Ayesha Jhulka Moves High Court, Seeking Expedited Justice, ayesha jhulka pet dog killed, ayesha jhulka dog killed case, mumbai high court, mumbai news,
हत्या झालेल्या श्वानाला न्याय मिळवून देण्यासाठी अभिनेत्री आयेशा जुल्का उच्च न्यायालयात
D Y Chandrachud News in Marathi
सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांनी उच्च न्यायालयांच्या ‘या’ कृतीवर व्यक्त केली चिंता; म्हणाले, “जे खटले १० महिन्यांपेक्षा जास्त…”
Sanjay Singh accused of making offensive remarks about Prime Minister Modi educational qualifications
संजय सिंह यांची याचिका फेटाळली; पंतप्रधान मोदी यांच्या पदवीबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचा आरोप

भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या भूमिकेबद्दल एक ट्वीट केलं आहे. त्यात त्यांनी म्हटलं आहे की, “सरकारचे काम सर्वोच्च न्यायालय करणार असेल, तर सर्वोच्च न्यायालयानेच देश चालवावा. कशाला हव्यात निवडणुका आणि संसद? खुर्चीत बसून कायदा सुव्यवस्थेची ऑर्डर पास केली की देश कसा सुरळीत चालेल.”

हे ही वाचा >> “मणिपूर घटनेप्रकरणी भाजपाच्या मनात गुन्हेगारी भावना, म्हणूनच त्यांनी…”, बाळासाहेब थोरातांचा टोला

भातखळकर यांचं ट्वीट पाहून काँग्रेसने यावर संताप व्यक्त केला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यापाठोपाठ आमदार यशोमती ठाकूर यांनीही यावर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. आमदार यशोमती ठाकूर अतुल भातखळकर यांना उद्देशून म्हणाल्या, अतुलदादा त्या ठिकाणी तुझी बहीण असती तर? तुझी बायको अथवा तुझी आई तिथे असती तर..? तरीसुद्धा तू असंच बोलला असतास का रे दादा? दादा आहेस ना तू, अरे दादा! राजकारण राजकारणाच्या ठिकाणी रे बाबा.., थोडी तरी संवेदनशीलता आहे की नाही? तुम्हाला (भाजपा) राजकारण करायच्या काही मर्यादा आहेत की नाही? तुम्ही कशातही राजकारण करता? या गोष्टीचा (भातखळकर यांच्या वक्तव्याचा) निषेध आहे.