यवतमाळ जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयात एका निवासी डॉक्टरवर रुग्णाने चाकुने हल्ला केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी (५ जानेवारी) घडली. या हल्ल्यात डॉक्टर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. विशेष म्हणजे हल्ल्यादरम्यान मदत करण्यासाठी आलेल्या दुसऱ्या डॉक्टरवरही या रुग्णाने हल्ला केला. या घटनेनंतर येथे एकच खळबळ उडाली असून आमची सुरक्षा वाढवण्यात यावी, अशी मागणी डॉक्टरांकडून कडून केली जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> “थेट शूट करण्याऐवजी माझा अपघात घडवून आणला जाऊ शकतो,” सुषमा अंधारेंच्या विधानामुळे खळबळ

एएनआयने दिलेल्या माहितीनुसार यवतमाळ जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात एका रुग्णाने निवासी डॉक्टरवर चाकुने हल्ला केला. याबाबत बीएमसी मार्डचे अध्यक्ष प्रविण ढगे यांनी अधिक माहिती दिली आहे. या हल्ल्यात डॉक्टर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. डॉक्टरांवरील हल्ल्याची ही पहिलीच घटना नसून याआधीही वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थ्यावर अशाच प्रकारे चाकूने हल्ला करण्यात आला होता,” असे प्रविण ढगे यांनी सांगितले.

“डॉक्टरांची सुरक्षा वाढवावी अशी मागणी आम्ही राज्य सरकारकडे केलेली आहे. मात्र सरकारने अद्याप कोणतेही पाऊल उचलले नाही,” अशी तक्रारही प्रविण ढगे यांनी केली.

“उद्योगपतींच्या नावाखाली मुंबई महापालिका निवडणुकीत…”; योगी आदित्यनाथ यांच्या मुंबई दौऱ्यावरून शिवसेनेचं टीकास्र

दरम्यान, या हल्ल्यामुळे यवतमाळमधील डॉक्टर संतप्त झाले आहेत. यवतमाळ तसेच राज्यभरातील निवासी तसेच शिकाऊ डॉक्टर आंदोलन करण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Yavatmal government hospital resident doctor patient attack by knife prd
First published on: 06-01-2023 at 09:02 IST