उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे दोन दिवसीय मुंबई दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी राज्यातील उद्योजकांची भेट घेतली. या भेटीदरम्यान विविध उद्योजकांनी उत्तर प्रदेशमध्ये पाच लाख कोटी रुपयांनी गुंतवणूक करण्याचे आश्वासन दिल्याची माहिती उत्तर प्रदेश सरकारकडून देण्यात आली आहे.

हेही वाचा – Delhi Kanjhawala Accident : अंजलीला फरफटत नेणाऱ्या कारच्या मालकाला दिल्ली पोलिसांनी घेतलं ताब्यात; ६व्या आरोपीला बेड्या!

फेब्रुवारी महिन्यात उत्तर प्रदेशमध्ये ग्लोबल इन्व्हेस्टर्स समिटचे आयोजन करण्यात आले आहे. या समिटमध्ये उद्योजकांना सहभागी होण्याचे निमंत्रित देण्यासाठी योगी आदित्यनाथ हे दोन दिवसीय मुंबई दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी रिलायन्स समुहाचे प्रमुख मुकेश अंबानी यांच्यासह टाटा सन्स, अदानी समूह, गोदरेज, बिर्ला, पिरामल, वेदांत, पार्ले, हिंदुजा, लोढा आदी कंपनीच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली.

हेही वाचा – महिलेच्या अंगावर लघुशंका प्रकरण : DGCA ने एअर इंडियाला फैलावर घेतलं; म्हणाले, “हा प्रकार…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या दरम्यान, रिलायन्स उद्योगसमूहाचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी उत्तर प्रदेशमध्ये इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन आणि हरित ऊर्जा क्षेत्रात मोठ्या गुंतवणुकीचे आश्वासन दिले. तसेच अदानी समूहाने पीपीपी मॉडेलवर आधारित वैद्यकीय संस्था उभारण्याचे आश्वासन दिल्याची माहिती उत्तर प्रदेश सरकारकडून देण्यात आली आहे. याबरोबरच अदानी समूह नोएडा येथे कौशल्य विकास केंद्र स्थापन करणार असल्याचेही उत्तर प्रदेश सरकारकडून सांगण्यात आले आहे.