आज (मंगळवार)  मुंबईच्या एमएमआरडीए मैदानावर संपन्न होणाऱ्या ‘२०व्या वार्षिक लाइफ ओके स्क्रीन पुरस्कार सोहळ्या’चे सुत्रसंचालन बॉलिवूडचा प्रसिध्द अभिनेता शाहरूख खान करणार आहे. बॉलिवूडच्या बादशाहाने यासाठीचा ससराव केला. काल संध्याकाळी कार्यक्रमाच्या ठिकाणी आलेल्या शाहरूखने रात्री उशिरापर्यंत रंगीत तालीम केली.
यावेळी शाहरूखबरोबर ‘देवों के देव… महादेव’ मालिकेतील अभिनेता मोहित रैना सुध्दा उपस्थित होता. मोहीत आणि शाहरूख स्टेजवर एकत्र दिसणार आहेत. गत वर्षी चित्रपटगृहात झळकलेल्या शाहरूख खानच्या ‘चैनई एक्सप्रेस’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली. या चित्रपटातील भूमिकेसाठी ‘उत्कृष्ट अभिनेता (पुरूष)’ विभागात त्याचे नामांकन झाले आहे. याशिवाय चाहत्यांच्या पसंतीच्या निकशावर निवडण्यात योणाऱ्या ‘बेस्ट अॅक्टर (मेल) बाय पॉप्युलर चॉइस’ विभागातदेखील त्याचे नामांकन झाले आहे.

संबंधित बातम्या –

१. स्क्रीनच्या रंगीत तालमीत दीपिका व्यस्त
२. स्क्रीन पुरस्कारांमध्ये सचिन खेडेकर, नितीश भारद्वाज, देविका दफ्तरदार यांना नामांकने
३. ‘स्क्रीन पुरस्कार २०१४’साठी बॉलिवूड सज्ज
४. ‘स्क्रीन पुरस्कार २०१४’चा होस्ट शाहरूख खान

फोटो अल्बम –

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

१. शाहरूख आणि दीपिका ‘स्क्रीन पुरस्कार सोहळा – २०१४’साठी सज्ज
२. स्क्रीन पुरस्कार सोहळा पूर्वतयारी
३. ‘स्क्रीन पुरस्कार २०१४’साठी नामांकन
४. स्क्रीन पुरस्कारांच्या नामांकनाच्या पार्टीत इरफान, रिचा चढ्ढा, श्रध्दा कपूर आणि अन्य – भाग २
५. स्क्रीन पुरस्कारांच्या नामांकनाच्या पार्टीत इरफान, रिचा चढ्ढा, श्रध्दा कपूर आणि अन्य – भाग १