News Flash

Top 5: ‘या’ पंजाबी अभिनेत्री टाकतील दीपिका- कतरिनाला मागे

पंजाबी अभिनेत्रींचा रुबाब आलिया, दीपिकापेक्षा तसुभरही कमी नाही.

बॉलिवूड अभिनेत्रींबद्दल बोलायचे झाले तर बॉलिवूडप्रेमी कितीही वेळ बोलू शकतो. पण आज आम्ही अशा पाच पंजाबी अभिनेत्रींबद्दल तुम्हाला माहिती देणार आहोत ज्यांच्या मादक अदांनी पंजाबी सिनेसृष्टीची ओळखच बदलून गेली. या पाच अभिनेत्रींना बॉलिवूडच्या नावाजलेल्या अभिनेत्रींपेक्षा कमी समजू नका. पंजाबी अभिनेत्रींना मिळणारे मानधन जरी कमी असले तरी त्यांचा रुबाब आलिया, दीपिकापेक्षा तसुभरही कमी नाही.

नीरु बाजवा-

नीरु बाजवा ही पंजाबी सिनेसृष्टीची सुपहिट अभिनेत्री आहे. नीरुने तिच्या करिअरची सुरूवात बॉलिवूडचे सुपरस्टार देव आनंद यांच्या मैं सोलह बरस की या सिनेमातून केली होती. तिने २०१४ मध्ये ‘असा नु मान वत्ना दा’ या सिनेमातून पंजाबी सिनेसृष्टीत पदार्पण केले. पंजाबी सिनेमांमध्ये यशस्वी ठरलेल्या अभिनेत्रींपैकी एक नीरु बाजवा आहे.

सुरवीन चावला-

सुरवीन चावलाचं नाव हेट स्टोरी- २ मुळे अधिक चर्चेत आलं होतं. बॉलिवूडमधील बोल्ड अभिनेत्री म्हणून तिच्याकडे पाहिले जाते. बॉलिवूडशिवाय सुरवीनने अनेक पंजाबी सिनेमांमध्ये काम केले आहे. डिस्को सिंह, सिंह वर्सेज कौर, लकी दी अनलकी स्टोरी या हिट सिनेमांमध्ये सुरवीनने काम केले आहे.

धृती सहारन-

धृती सहारनला पंजाबी सिनेसृष्टीची अष्टपैलु अभिनेत्री म्हटले जाते. धृती गायिकाही आहे. धृत इंडियन आयडलच्या अंतिम फेरीपर्यंत पोहोचली होती. पंजाबी सिनेमांमधून आपल्या करिअरला सुरूवात करणाऱ्या धृतीला सड्डा हक या सिनेमातून खरी ओळख मिळायला सुरूवात झाली.

रुहानी शर्मा-

२०१३ मध्ये कुडी तू पटाखा हे गाणे मोठ्या प्रमाणात गाजले होते. या गाण्यातून रुहानी शर्माची ओळख अख्या जगाला झाली होती. अनेक संकटांवर मात करत आपल्या करिअरमध्ये यश मिळवले आहे. तिने गैरी संधु, एमी विर्क अशा नावाजलेल्या गायकांसोबत काम केले आहे.

सारा ग्रुपाल-

पंजाबी सिनेसृष्टीत सर्वात मादक अभिनेत्री म्हणून सारा ग्रुपालकडे पाहिले जाते. साराने अगदी कमी वेळात सिनेसृष्टीत आपली ओळख बनवली आहे. साराचे प्रत्येक गाणे हिट आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 12, 2018 4:58 pm

Web Title: 5 top punjabi heroines who can fail deepika and katrina in bollywood
Next Stories
1 आणखी एका प्रेमाचा संघर्ष रुपेरी पडद्यावर; ‘झिंग प्रेमाची’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
2 ‘द कपिल शर्मा शो’ची ‘सेल्फी मौसी’ या शोमधून कमबॅक करणार
3 Sanju Movie : ‘संजू’विषयी खुद्द संजय दत्तच काय बोलतोय ऐकलं का?