29 September 2020

News Flash

लगीनघाई, ‘या’ वर्षामध्ये प्रभास बोहल्यावर चढणार ?

प्रभास 'मोस्ट एलिजिबल बॅचलर' म्हणून ओळखला जातो.

प्रभास

बॉलिवूडमध्ये सध्या लग्नाचे वारे वाहू लागले आहेत. यात अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग लवकरच लग्न करणार आहे. या जोडीनंतर दाक्षिणात्य अभिनेता प्रभासदेखील बोहल्यावर चढणार असल्याची चर्चा रंगली आहे. ‘मोस्ट एलिजिबल बॅचलर’ म्हणून ओळखला जाणारा प्रभास २०१९ मध्ये लग्न करणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

‘इंडिया टुडे’नुसार, गेल्या अनेक दिवसापासून दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत आणि प्रभासच्या चाहत्यांमध्ये त्याच्या लग्नाविषयी चर्चा सुरु आहे. ‘बाहुबली’ चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण झाल्यानंतर प्रभास लग्न करणार असल्याचं म्हटलं जात होतं. परंतु हा चित्रपट पूर्ण होत नाही तोच प्रभास ‘साहो’ चित्रपटामध्ये व्यस्त झाला. त्यामुळे त्याच्या लग्नाचा बेत पुढे ढकलला गेला. परंतु आता ‘साहो’चं चित्रीकरण पूर्ण झाल्यानंतर म्हणजे २०१९ मध्ये प्रभास लग्न करणार आहे. विशेष म्हणजे ही माहिती प्रभासच्या जवळच्या व्यक्तीने दिली आहे.

प्रभास २०१९ मध्ये लग्न करणार असल्याची जरी चर्चा रंगली असली तरी तो कोणासोबत लग्न करणार हे मात्र स्पष्ट झालेलं नाही. विशेष म्हणजे मध्यंतरी प्रभास आणि अभिनेत्री अनुष्का शेट्टी यांच्या अफेअरच्या वावड्या उठल्या होत्या. दरम्यान, ‘साहो’ या चित्रपटाचे फर्स्ट शेड्यूल सुरू होणार आहे. खुद्द प्रभासने आपल्या सोशल अकाऊंटवर याची घोषणा केली असून युरोपच्या पार्श्वभूमीवर असलेला हा आगामी चित्रपट बिग बजेट चित्रपट असणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 27, 2018 9:55 am

Web Title: actor prabhas to get married in 2019 after saaho release
Next Stories
1 Thugs of Hindostan : …अन् प्रभुदेवामुळे साकार झाली ‘सुरैय्या’ – कतरिना
2 अलोक नाथ यांना दिलासा नाहीच!
3 खय्याम यांना हृदयनाथ मंगेशकर पुरस्कार प्रदान
Just Now!
X