News Flash

‘मरणं सोपं आहे पण जगणं कठीण’; मराठी कलाकाराची मदतीसाठी भावनिक साद

"सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केली, पण मी आत्महत्या करणार नाही."

अभिनेता रोहन पेडणेकर

लॉकडाउनचा फटका सर्वच क्षेत्रांना बसला आहे. त्यात मनोरंजनसृष्ट्रीचाही समावेश आहे. शूटिंग बंद झाल्याने अनेक कलाकारांसमोर, पडद्यामागील कर्मचाऱ्यांसमोर आर्थिक संकटं उभी राहिली. मराठी रंगभूमी कलाकार रोहन पेडणेकरवरही सध्या ही वाईट परिस्थिती आली आहे. लॉकडाउनमुळे काम नसल्याने मागील तीन महिन्यांपासून तो घरीच आहे. आर्थिक संकटातून मार्ग काढण्यासाठी त्याने लघु उद्योग सुरु केला आहे.

रोहनने काही मित्रांच्या मदतीने सुका म्हावरा विकण्याचं काम सुरू केलं आहे. दादर ते बोरिवली मोफत घरपोच सेवा तो पोहचवतोय. मला कोणाकडून उसने पैसे नको पण तुम्ही माझ्याकडून वस्तू विकत घ्या, असं आवाहन तो लोकांना करतोय. यासंदर्भात त्याने फेसबुकवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ‘माझ्या घरी मी, माझी आई आणि सहा महिन्यांचं लहान बाळ आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केली, पण मी आत्महत्या करणार नाही. कलाकार असलो तरी मी खमका आहे. या परिस्थितीशी मी लढणार आहे. मरणं सोपं आहे पण जगणं कठीण आहे. माझ्या या लढाईत मला तुमची साथ मिळेल अशी अपेक्षा करतो’, असं त्याने या व्हिडीओत म्हटलंय.

रोहनने अलीकडेच ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ या मालिकेत सहस्त्रबुद्धे यांची व्यक्तीरेखा साकारली. त्याने आतापर्यंत अनेक व्यावसायिक व प्रायोगिक नाटकांमध्ये काम केलंय.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 18, 2020 3:13 pm

Web Title: actor rohan pednekar asking for help posted video on facebook ssv 92
Next Stories
1 सुशांतने महेश शेट्टीला केला होता अखेरचा कॉल, आत्महत्येविषयी कळताच…
2 “शुटिंगदरम्यान मला धमकावले जायचे”; अभिनेत्रीने सांगितला बॉलिवूडमधील धक्कादायक अनुभव
3 ..जेव्हा सुशांतने आलिया भट्टवर व्यक्त केली होती नाराजी