30 October 2020

News Flash

सलमान खानला वाटतेय ‘या’ गोष्टीची भीती

अनेकदा याचा त्रासही होत असल्याचं तो म्हणाला.

सलमान खान

सलमान खान दबंग ३ च्या निमित्तानं पुन्हा एकदा चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवण्यासाठी येत आहे. सध्या तो याच चित्रपटाच्या शूटींगमध्ये व्यग्र आहे. सलमान आणि त्याचा फिटनेस हे नातं सर्वांच्याच परिचयाचं आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर तो यासंदर्भातील नवनवे व्हिडीओ शेअर करताना दिसत आहे. सलमानच्या अन्य अॅक्शनपटांसारखाच दबंग ३ मध्येदेखील सलमान निरनिराळे स्टंट करताना दिसेल. परंतु गेल्या काही दिवसांपासून एक गोष्ट आपल्याला सतावत असल्याची माहिती खुद्द सलमाननंच एका मुलाखतीदरम्यान दिली. वाढत्या वयोमानानुसार अॅक्शन सीन करणं आपल्याला कठिण जात असल्याचं सलमान म्हणाला.

मी पहिल्यापासून अॅक्शन चित्रपट केले आहेत. त्यामुळे अशा सीन्सची माझ्या शरीराला सवय झाली आहे. परंतु या वयात अॅक्शन सीन देणं हे खुप कठीण झालं आहे. माझ्या वाढत्या वयामुळे यात मला त्रास होतो. अनेकदा अॅक्शन सीन देताना मला पाच ते सहा वेळा त्याची रिहर्सल करावी लागते. यामध्ये अनेकदा मला दुखापतही होते. अनेकदा यामध्ये थकायलाही होतं, असं सलमान एका मुलाखतीदरम्यान म्हणाला होता.

आम्हाला प्रेक्षकांसाठी काहीतरी नवं आणि चांगलं द्यावं लागतं. त्यामुळे यात खुप मेहनत करावी लागते. यासाठी तुमची वागणूक चांगली असावी लागते. जास्त काम असल्यानं अनेकदा दोन ते तीन तास झोप मिळते. तसंच ज्यावेळी वेळ मिळतो त्यावेळी चित्र काढणं किंवा लिहिण्यासारखे छंदही जोपासत असल्याचं तो म्हणाला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 7, 2019 9:05 am

Web Title: actor salman khan scared of his age says in interview dabaang 3 action scenes jud 87
Next Stories
1 ‘ग्लॅमर’साठी ‘वाट्टेल ते’ करु नका
2 …आपण बसलोय शेतीवरचे सिनेमे करत; प्रवीण तरडे यांची राजकारणावर खरपूस टीका
3 डिसेंबरमध्ये ही प्रसिद्ध अभिनेत्री वयाच्या ३८व्या वर्षी करणार लग्न?
Just Now!
X