07 August 2020

News Flash

कलाकारांवरची ‘आप’ बिती..

‘आम आदमी पार्टी’च्या नव्या विचारांनी प्रभावित होऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या बॉलिवूड कलाकारांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे.

| May 17, 2014 12:36 pm

‘आम आदमी पार्टी’च्या नव्या विचारांनी प्रभावित होऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या बॉलिवूड कलाकारांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. अभिनेत्री गुल पनागला चंदीगढमध्ये आपल्याच सहकलाकारांकडून दगाफटका झाला. लखनौमधून ‘आप’चे उमेदवार अभिनेता जावेद जाफरी पराभूत झाला. तर बीडमध्ये गोपीनाथ मुंडे यांच्याविरूध्द निवडणूक लढवणारा अभिनेता नंदू माधव आणि अहमदनगरमधील उमेदवार अभिनेत्री दिपाली सय्यद हेही अपयशी ठरले आहेत. काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवणारे सगळेच कलाकार मोदी लाटेत वाहून गेले आहेत. यात प्रामुख्याने अभिनेता राज बब्बर, भोजपुरी अभिनेता रवी किशन, यांचे नाव घ्यावे लागेल. बिहारमधून जनता दलतर्फे निवडणूक लढविणारे दिग्दर्शक प्रकाश झा दुसऱ्यांदा पराभूत झाले असून मनसेच्या उमेदवारीद्वारे राजकारणात मराठीचा झेंडा रोवू पाहणारे महेश मांजरेकरांनाही यश मिळवता आलेले नाही. एकूणच, मोदींच्या आधाराने राजकारणात उडी घेणाऱ्या कलाकारांना ही निवडणूक लाभदायी ठरली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 17, 2014 12:36 pm

Web Title: actors actress aap biti
टॅग Lok Sabha Election
Next Stories
1 लोकसभा विजयाबद्दल बॉलीवूडकरांनी केले मोदींचे अभिनंदन
2 झलक दिखला जा ७: स्पर्धकांची संपूर्ण यादी
3 रजनिकांतनी केले मोदींचे अभिनंदन
Just Now!
X