बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक उदित नारायण यांचा मुलगा आदित्य नारायण लवकरच लग्न बंधनात अडकणार आहे. ऑक्टोबर महिन्यात त्याने गर्लफ्रेंड श्वेता अग्रवालशी लग्न करणार असल्याचा खुलासा होता. पण लग्न केव्हा करणार हे त्याने सांगितले नव्हते. आता आदित्यच्या लग्नाची तारीक समोर आली आहे.

आदित्य गर्लफ्रेंड श्वेताशी १ डिसेंबर रोजी लग्न करणार आहे. करोना व्हायरसमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे काही मोजक्याच लोकांना विवाह सोहळ्याचे आमंत्रण देण्यात येणार आहे. तसेच विवाह सोहळा एका मंदिरात असणार आहे.

‘शापित’ चित्रपटाच्या सेटवर आदित्य आणि श्वेताची ओळख झाली होती. सुरुवातीला त्यांच्यामध्ये मैत्रीचे नाते होते. गेल्या १० वर्षांपासून ते दोघे एकमेकांना ओळखतात. आदित्य हा एक गायक आणि अभिनेता आहे. त्याने रिअॅलिटी शो इंडियन आयडलचे सूत्रसंचालन केले आहे. आदित्यची गर्लफ्रेंड श्वेता ही एक अभिनेत्री आहे. तिने दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम केले आहे. येत्या १ डिसेंबरला ते दोघे लग्न बंधनात अडकणार आहेत.