News Flash

अक्षय-गोविंदानंतर विकी कौशलला करोनाची लागण

विकी सध्या होम क्वारंटाइन आहे...

(Photo credit : vicky kaushal instagram)

राज्यात करोना संसर्ग अधिकच झपाट्याने वाढत आहे. दररोज करोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढतं आहे. तर, मृत्यूंच्या संख्येतही मोठी भर पडत आहे. अगदी सर्वसामान्य नागरिकांपासून ते दिग्गजांपर्यंत सर्वचजण करोनाच्या विळख्यात सापडत आहेत. आता बॉलिवूडचा खिलाडी म्हणजेच अक्षय कुमार आणि गोविंदा नंतर अभिनेता विकी कौशलला करोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.

विकीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर करत याची माहिती दिली आहे. “संपूर्ण काळजी घेऊनही माझी करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मी सध्या होम क्वारंटाइन आहे. मी माझ्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सर्व सेफ्टी प्रोटोकॉल फॉलो करत आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सगळ्यांना मी विनंती करतो की त्यांनी स्वत:ची करोना चाचणी करून घ्या आणि काळजी घ्या,” अशा आशयाची पोस्ट विकीने केली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Vicky Kaushal (@vickykaushal09)

आणखी वाचा- करोनाची लागण झाल्यानंतर अक्षय कुमार रुग्णालयात दाखल, चाहत्यांना म्हणाला…

दरम्यान, काल बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार आणि गोविंदा यांची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. सोबतच काही दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेत्री आलिया, रणबीर कपूर, आमिर खान, आर माधवन, विक्रांत मेसी, कार्तिक आर्यन, फातिमा सना शेख आणि गायक आदित्य नारायण आणि त्याच्या पत्नी या कलाकारांची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 5, 2021 12:57 pm

Web Title: after akshay kumar and govinda now vicky kaushal is tested corona positive dcp 98
Next Stories
1 अभिनेता,दिग्दर्शक प्रियदर्शन जाधव करोना पॉझिटिव्ह; उपचारासाठी रुग्णालयात दाखल
2 अनुष्काची प्रेरणा आणि विराटची खास कामगिरी…
3 इरा नव्हे तर हे आहे आमिरच्या लेकीचं खरं नाव; “चुकीचं नाव उच्चारल्यास ५ हजार दंड”
Just Now!
X