News Flash

दुसऱ्या बाळाला जन्म दिल्यानंतर पहिल्यांदाच आला करीना-सैफचा फोटो समोर

पाहा फोटो

बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान ने दुसऱ्यांदा मुलाला जन्म दिला. तेव्हा पासून दररोज तिच्या मुलाला आणि तिच्या संपुर्ण कुटूंबाला भेटायला अनेक बॉलिवूड कलाकार जाताना दिसतात. काल त्यांना भेटायला करीनाचे खास मित्र आले होते. त्याचा एक फोटो अभिनेत्री करिश्मा कपूरने सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यानंतर चाहत्यांनच लक्ष हे त्यात करीनाचं बाळ दिसतं आहे का? या कडे लागले आहे. सोबतच करीनाने दुसऱ्यांदा बाळाला जन्म दिल्यानंतर पहिलांदाच सैफ आणि तिचा एकत्र फोटो समोर आला आहे.

करिश्माने हा फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. शेअर केलेल्या या फोटोत अभिनेत्री मलायका अरोरा, अमृता अरोरा, करीना कपूर खान आणि पती सैफ अली खान सोबतच फॅशन डिझायनर मनिष मल्होत्रा दिसत आहेत. दुसऱ्या बाळाला जन्म दिल्यानंतर करीना आणि सैफ पहिलांदा कोणत्या फोटोमध्ये एकत्र दिसत आहेत. या फोटोत करीनाने ऑलिव्ह रंगाचे शर्ट तर सैफने पांढऱ्या रंगाचा कुर्ता- पायजमा परिधान केला आहे. हा फोटो शेअर करतं करिश्माने ‘सुंदर संध्याकाळ’ असे कॅप्शन दिले आहे. या फोटोत सगळे एकत्र दिसत असल्यानं करिना आणि सैफचं दुसरं बाळही पाहायला मिळेल अशी चाहत्यांना आतुरता होती. मात्र, फोटोत बाळ कुठेच दिसत नसल्यानं चाहते निराश झाले आहेत

करीनाने २१ फेब्रुवारी रोजी तिच्या दुसऱ्या मुलाला जन्म दिला आहे. तर त्यांचा पहिला मुलगा तैमूर काही दिवसांपुर्वीच ४ वर्षांचा झाला आहे. ज्या प्रमाणे करीना आणि सैफने तैमूरला सगळ्यांसमोर आणले होते. त्याप्रमाणे ते त्यांच्या दुसऱ्या मुलाला आणणार नाही, अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. तरी देखील त्यांचे चाहते छोट्या नवाबची एक झलक पाहण्यासाठी आतुर आहेत.

दरम्यान, सैफने पालकत्वासाठी ‘आदिपुरूष’च्या चित्रीकरणातून काही दिवस ब्रेक घेतला होता. जेणे करून तो करीना आणि होणाऱ्या बाळासोबत थोडे दिवस निवांत राहू शकेल. मात्र आता सैफ लवकरच ‘आदिपुरूष’च्या चित्रीकरणाला सुरूवात करणार आहे. तर सैफने या आधीच ‘भूत पोलिस’ या चित्रपटाचे चित्रीकरण संपवले होते. दुसरीकडे करीना ‘लाल सिंग चढ्ढा’ आणि ‘तख्त’ या चित्रपटांतून आपल्या सगळ्यांना भेटायला येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 4, 2021 11:10 am

Web Title: after giving birth to the second child first time saif and kareena captured in a photo dcp 98
Next Stories
1 अनुराग-तापसीची पुण्यात रात्री उशिरापर्यंत चौकशी; तीन दिवस चालणार झाडाझडती?
2 अन् अभिषेकने खेचत नेलं ऐश्वर्याला, व्हिडीओ व्हायरल
3 हा आहे साराचा ‘विटामिन-सी’डोस, शेअर केले हॉट फोटो
Just Now!
X