News Flash

‘पावरी’नंतर आता ‘पुलाव’ ट्रेंडमध्ये, ट्रोल करणाऱ्यांना मिळणार आता ‘या’ अंदाजात उत्तर

यशराज मुखातेचं नवं गाणं

सोशल मीडिया काही दिवसांपूर्वी ‘पावरी हो रही है’ या ट्रेंडने धुमाकुळ घातला होता. सोशल मीडियावरील नेटकऱ्यांपासून अनेक सेलिब्रिटींनी ट्रेंडमध्ये सहभागी होत धमाल व्हिडीओ शेअर केले होते. पावरी साँगला बीटस् देऊन ते हिट करणाऱ्य़ा यशराज मुखातेने यावेळी नेटकऱ्यांसाठी एक नवा ट्रेंड आणला आहे. यशराज त्याच्या म्युझिक स्टाईलसाठी ओळखला जातो. एखाद्या डायलॉगला तो त्याच्या हटके स्टाईलमध्ये म्युझिक देऊन त्याचं रॅप तयार करतो. त्याचे हे धमाल रॅप सोशल मीडियावर ते धुमाकुळ घालतात.

यशराजने नेटकऱ्यांसाठी पुन्हा एकदा नवं गाण आणलं आहे. काही वेळात हे नवं गाणंदेखील ट्रेंड होऊ लागलं आहे. यावेळी मात्र त्याला साथ दिलीय ती इन्स्टाग्रामवरील फेमस असलेल्या स्मिता सातपुते यांनी. स्मिता सातपुते इन्स्टाग्रामवर कॉमेडी रीलस् पोस्ट करत असतात. त्याचसोबत ट्रोलर्सना सडेतोड उत्तर देण्यासाठी त्या ओळखल्या जातात. त्यामुळे यशराजे त्यांच्या एका व्हिडीओवर आधारीत नवं गाणं नेटकऱ्यांसाठी तयार केलंय.

या गाण्याच्या सुरुवातील स्मिता सातपुते कमेंट करणाऱ्यांना उत्तरदेताना दिसताय. त्या म्हणताय ” कमेंट करणाऱ्यांनो लक्षात ठेवा..माझं आयुष्य आहे.. तुमला काय घेणं देण. मी कशीही जगेन.. काय?” स्मिता यांच्या काही डायलॉगला म्युझिक देत यशराजने त्याचं रॅप त्यात मिस्क केलं आहे. या रॅपला देखील अनेकांची मोठी पसंती मिळतेय.

 

View this post on Instagram

 

A post shared by Yashraj Mukhate (@yashrajmukhate)

या रॅपमधील खास करून एक वाक्य अनेकांना आवडलं आहे. यात तो मराठीत म्हणाला आहे, “व्हेज बिर्याणी म्हणून कुठली डिश नसते. इटस् पुलाव ब्रो.” सोशल मीडियावर हे गाणं सध्या ट्रेंड होत आहे. यशराज आणि स्मिता यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर हे गाणं शेअर केलं आहे. यशराजच्या या व्हिडीओला अभिनेत्री अमृता खानविलकर हिने कमेंट करत कौतुक केलं आहे. “काय़ रॅप केलंय.” अशी कमेंट अमृताने केलीय. तर अभिनेत्री दिप्ती देवीनेदेखील कमेंट करत यशराजच्या गाण्याचं कौतुक केलंय.

याआधी यशराजने तयार केलेलं पावरी साँग चांगलंच ट्रेंड झालं. तसचं बिग बॉस फेम शेहनाज गीलच्या एका संवादावर त्याने तयार केललेलं “तुम्हारी फिलिंग तुम्हारी” हे गाणही सोशल मीडियावर गाजलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 20, 2021 9:05 am

Web Title: after pawari now pulao is in trend yashraj mukhate latest remix goes viral kpw 89
Next Stories
1 संगीतकार वाजिद यांची पत्नी मालमत्तेच्या वादामुळे न्यायालयात
2 करोनातून बरी झाल्यावर भूमी पेडणेकर झाली करोना योद्धा; म्हणाली, “या लढाईत हे …”
3 “तो आता घरात आलाय”; स्वरा भास्करचं ट्विट
Just Now!
X