News Flash

शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट! स्टँडअप कॉमेडियननंतर मराठी अभिनेत्रीने केला महाराजांचा एकेरी उल्लेख

अभिनेत्रीवर नेटकऱ्यांकडून जोरदार टीका

स्टँडअप कॉमेडियन अग्रिमा जोशुआने छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. जोशुआने छत्रपती शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रातील प्रस्तावित पुतळ्यासंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर शिवप्रेमींनी तिच्यावर कठोर शब्दांत टीका केली. त्यानंतर आता मराठी अभिनेत्री केतकी चितळे हिने फेसबुकवर एक पोस्ट लिहिली आहे. मात्र या पोस्टमध्ये केतकीनेही महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याने ती ट्रोल होत आहे.

‘शिवाजी, फक्त एवढे ऐकले की आम्ही उगाच पेटून उठणार. मजकूर आम्हाला तसाही कधी कळतच नाही, कारण तेवढी आमची बुद्धीमत्ता मुळातच नाही. मग ३ वर्षाच्या मुलाची बौद्धिक पातळी असलेले स्वघोषित मावळे, शिवाजी हा एक शब्द ओळखतात आणि महाराजांच्या शिकवणीला फाट्यावर मारून, महाराजांच्या नावावर राजकारण करायचा पोकळ विनोद सुरू करतात. बरं, अशा वागण्यानी आपण आपली लायकी दाखवून देतोय हे त्यांच्या लक्षात येत नाहीच. अर्थात हे कळण्यासाठीही नखाएवढी अक्कल लागतेच म्हणा’, अशी फेसबुक पोस्ट केतकी चितळे हिने केली आहे.

‘सोशल मिडीयावर ‘मराठी’ असा शब्द टाकून वाटेल तसा वणवा, काही लाईक्ससाठी पेटवणारे २० ते २५ वयोगटातील पोरे, ज्यांना खऱ्या आयुष्यात कुणी भाव अथवा नोकरी ही देणार नाही अशी कार्टी, या सर्कस चे रिंग मास्टर असतात. अरे मूर्खांनो, शालेय शिक्षण तरी घ्या! पण ते तरी कसे घेणार, कारण आमचे प्रेरणास्थान तर आर्ची (नाव ही मराठी नाही) आणि पर्शा! आम्ही फक्त भांडण करण्यासाठी महाराज, बाबासाहेब, फुले यांची नावे घेणार, त्यांनी लिहिलेल्या साहित्याचा अभ्यास कोण करणार!! सुधारणा करा बाळांनो, शिका’, असंही केतकीने तिच्या फेसबुक पोस्टमध्ये पुढे म्हटलं आहे.

केतकीच्या या पोस्टनंतर तिच्यावरही जोरदार टीका केली जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 11, 2020 12:07 pm

Web Title: after stand up comedian agrima joshua comment marathi actress ketaki chitale comment on chhatrapati shivaji maharaj ssv 92
Next Stories
1 बिग बींनी दिला जुन्या आठवणींना उजाळा; मुलांसोबत फोटो शेअर करत म्हणतात…
2 उर्वशी रौतेलाने वाढवली फी; ‘व्हर्जिन भानुप्रिया’साठी घेतले तब्बल इतके कोटी रुपये
3 ते फकस्त ६०० व्हते…पाहा ‘जंगजौहर’चं नवीन पोस्टर
Just Now!
X