News Flash

‘मालिकेवर टीका केली पण…’; ‘अग्गंबाई सासूबाई’बाबत निवेदिता सराफ यांची पोस्ट

मालिकेचं जितकं कौतुक झालं, तितकीच त्याच्यावर टीकासुद्धा झाली.

निवेदिता सराफ

छोट्या पडद्यावरील ‘अग्गंबाई सासूबाई’ या मालिकेने अल्पावधीतच लोकप्रियता मिळवली. या मालिकेतील प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांच्या मनावर विशेष छाप सोडली आहे. जवळपास तीन महिने ब्रेक घेतल्यानंतर आता पुन्हा एकदा मालिकेच्या शूटिंगला सुरुवात झाली असून नवीन एपिसोड्स प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. मालिकेचं जितकं कौतुक झालं, तितकीच त्याच्यावर टीकासुद्धा झाली. यावर अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट लिहिली आहे.

‘अग्गंबाई सासूबाई या आमच्या मालिकेला एक वर्ष पूर्ण झालं. या मालिकेला लोकांनी खूप छान प्रतिसाद दिला. अगदी अपेक्षेपेक्षा जास्त चांगला, काही प्रमाणात टीका ही केली. पण तरीही आसावरीवर खूप प्रेमही केलं. आसावरीची व्यक्तिरेखा साकारणं हे माझ्यासाठी खूप मोठं आव्हान होतं. आसावरीनं खूप काही शिकवलं, पारितोषिकं दिली. हे सगळं शक्य झालं ते आमच्या उत्कृष्ट टीममुळे..मी झी मराठी, निर्माते, दिग्दर्शक, लेखक आणि सर्व सहकलाकार आणि तंत्रज्ञांची आणि प्रेक्षकांची खूप खूप आभारी आहे,’ अशी पोस्ट निवेदिता यांनी लिहिली. त्याचसोबत त्यांनी मालिकेतील क्षणचित्रांचा एक फोटो पोस्ट केला आहे.

आणखी वाचा : अखेर राणादाचा एन्काऊंटर होणार?  

‘अग्गंबाई सासूबाई’ या मालिकेत निवेदिता सराफ यांच्यासोबतच गिरीश ओक, तेजश्री प्रधान, आशुतोष पत्की यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 27, 2020 1:19 pm

Web Title: aggabai sasubai actress nivedita saraf wrote post about serial ssv 92
Next Stories
1 जेठालालचं इन्स्टाग्रामवर पदार्पण; पहिल्याच दिवशी केली ‘ही’ पोस्ट
2 अखेर राणादाचा एन्काऊंटर होणार?  
3 “स्टारकिडसाठी मला सिनेमातून काढून टाकलं”; ‘तुंबाड’ फेम अभिनेत्रीचा खुलासा
Just Now!
X