11 August 2020

News Flash

अग्गंबाई सासूबाई : शुभ्रा-सोहमची ऑफस्क्रीन केमिस्ट्री

आशुतोषने सोशल मीडियावर पोस्ट केला फोटो

आशुतोष पत्की, तेजश्री प्रधान

अभिनेत्री तेजश्री प्रधान हिने ‘अग्गंबाई सासूबाई’ या मालिकेतून छोट्या पडद्यावर दमदार पुनरागमन केलं. अल्पावधीत या मालिकेने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. आशुतोष पत्कीने या मालिकेच्या माध्यमातून छोट्या पडद्यावर पदार्पण केलं आहे. तेजश्री आणि आशुतोष हे मालिकेत पती-पत्नीच्या भूमिकेत आहेत. शुभ्रा आणि सोहम अशी त्यांच्या पात्रांची नावं आहेत. सोहम मालिकेत जरी नकारात्मक भूमिका साकारत असला तरी खऱ्या आयुष्यात तो तेजश्रीचा चांगला मित्र आहे. आशुतोषने सोशल मीडियावर नुकताच एक फोटो पोस्ट केला आहे. ‘पिझ्झा टाइम’ अशी कॅप्शन त्याने या फोटोला दिली आहे.

मालिकेतील आशुतोषच्या दमदार अभिनयाचं प्रेक्षकांकडून कौतुक होतंय. तर दुसरीकडे शुभ्रा या भूमिकेमुळे तेजश्री पुन्हा एकदा घराघरात लोकप्रिय झाली आहे. ऑनस्क्रीन जरी या दोघांमध्ये खटके उडत असले तरी ऑफस्क्रीन मात्र या दोघांची चांगली गट्टी जमली आहे. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत तेजश्री मालिकेसाठी अनेकदा मदत करत असल्याचं आशुतोषने सांगितलं होतं. एखाद्या दृश्याच्या बाबतीत किंवा मराठी भाषेच्या बाबतीत तेजश्री नेहमी मार्गदर्शन करते, असं तो सांगतो.

आणखी वाचा : ‘अप्सरा’ने केलं लग्न? उलट्या मंगळसूत्रावरून चर्चांना उधाण

‘अग्गंबाई सासूबाई’ या मालिकेत आशुतोष आणि तेजश्रीसोबतच निवेदिता सराफा, गिरीश ओक आणि रवी पटवर्धन यांच्या मुख्य भूमिका आहेत. या मालिकेने टीआरपीच्या यादीतही बाजी मारली आहे. हटके कथानक आणि उत्तम कलाकार यांमुळे ही मालिका प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतेय.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 17, 2020 4:55 pm

Web Title: aggabai sasubai fame ashutosh patki and tejashree pradhan are bff in real life ssv 92
Next Stories
1 स्लिम झाली अन् अडचणीत आली; सारा अली खानला नवा ताप
2 ‘खऱ्या कलेला डावललं’; नेटकऱ्यांनी उपसलं #BoycottFilmFare चं अस्त्र
3 अमिताभ बच्चन यांना एका प्रश्नानं सोडलंय भंडावून; तुमच्याकडं उत्तर आहे का ?
Just Now!
X