31 October 2020

News Flash

आसावरीला अभिजीतपासून वेगळं करणार सोहम?

मालिका आता अतिशय रंजक वळणावर आली आहे.

गिरीश ओक, निवेदिता सराफ

‘अग्गंबाई सासूबाई’ या मालिकेला पाहता पाहता प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरलं. मालिकेचं नाविन्य, त्याची आगळी-वेगळी कथा, मालिकेचं वेगळं टेकिंग, निवेदिता सराफ-गिरीश ओक ही जोडी, इत्यादी. या सगळ्यामुळे ही मालिका अल्पशा कालावधीतच प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करतेय. ही मालिका आता अतिशय रंजक वळणावर आली आहे.

अभिजित आसावरीच्या दिमाखदार लग्न सोहळ्यानंतर आता ते दोघे राजस्थान-उदयपूरला फिरायला गेले आहेत. आसावरीचं जरी अभिजीतसोबत लग्न झालं असलं तरी तिचं सर्व लक्ष आजोबा, सोहम आणि शुभ्राकडे लागून राहिलेलं आहे. अभिजीत आणि आसावरीचं लग्न सोहमला मात्र पटलेलं नाही आहे आणि तो त्यांना कसं वेगळं करता येईल याच्या योजना आखतोय. त्या दिशेने सोहमने पहिलं पाऊल देखील उचललं आहे. अभिजीत आणि आसावरी या दोघांना एकमेकांपासून दूर ठेवण्यासाठी सोहम शुभ्राला घेऊन राजस्थान-उदयपूरला गेला आहे. एकीकडे अभिजीत राजे आसावरीसोबत राजस्थानची ट्रिप अविस्मरणीय बनवण्यासाठी खूप प्रयत्न करत आहेत तर दुसरीकडे सोहम त्या दोघांना एकत्र वेळ व्यतीत करायला मिळू नये म्हणून धडपड करतोय.

आणखी वाचा : रोहिणी हट्टंगडी पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर; ‘या’ मालिकेत साकारणार भूमिका

सोहम राजस्थानला पोहोचला तर आहे आता तो या दोघांना वेगळं करण्यासाठी काय करेल आणि त्यात तो यशस्वी ठरेल का हे प्रेक्षकांना आगामी भागात पाहायला मिळेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 30, 2020 11:44 am

Web Title: aggabai sasubai marathi serial latest updates ssv 92
Next Stories
1 रोहिणी हट्टंगडी पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर; ‘या’ मालिकेत साकारणार भूमिका
2 कपिल शर्मा एका एपिसोडसाठी घेतो इतकं मानधन; आकडा ऐकाल तर व्हाल थक्क
3 तापसीनं घडवली अद्दल; स्पर्श करण्याचा प्रयत्न करणाऱ्याचं मोडलं बोट
Just Now!
X