News Flash

‘अग्गंबाई सासूबाई’ मालिका निर्णायक वळणावर

बबड्याला होणार का त्याच्या चुकांची उपरती?

‘अग्गंबाई सासूबाई’ मालिका निर्णायक वळणावर

‘अग्गंबाई सासूबाई’ ही मालिका अल्पावधीतच लोकप्रिय ठरली. या मालिकेला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद तर मिळत आहेच पण प्रेक्षक ‘आसावरी, अभिजित, शुभ्रा आणि बबड्या’ या व्यक्तिरेखांच्या प्रेमात आहेत. अभिजित आपली सगळी संपत्ती सोहमच्या नावावर करून आसावरीसोबत घर सोडून निघून जातात आणि आपला वेगळा संसार थाटतात. शुभ्रा त्यांना सोहमच्या नकळत मदत करत असते. पण आता जसजशी मालिका पुढे जातेय तसतसे मालिकेत खूप घडामोडी घडणार आहेत. ही मालिका एका निर्णायक वळणावर आली आहे.

प्रेक्षक ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते तो क्षण त्यांना लवकरच अनुभवता येणार आहे कारण बबड्या आता सुधारणार आहे. कूकिंग स्पर्धेनंतर आसावरीने केलेल्या भाषणातून सोहमला खूप भरून येतं. त्याच्या डोळ्यात पाणी येतं. आपण कुठेतरी चुकलो याची त्याला जाणीव होते आणि तो मनापासून आईची माफी मागतो.

पाहा फोटो : मराठी अभिनेत्रींचं साड्यांचं सुंदर कलेक्शन

सोहमवर चिडलेली आसावरी त्याला माफ करणार का, सोहमला त्याने केलेल्या चुकांची उपरती होणार का आणि पुन्हा अभिजित – आसावरी आपल्या घरी जाणार का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. ही मालिका सोमवार ते रविवार रात्री ८.३० वाजता झी मराठीवर प्रेक्षकांच्या भेटीला येते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 21, 2020 11:27 am

Web Title: aggabai sasubai marathi serial updates will babadya change for his mother ssv 92
Next Stories
1 ‘डार्लिंग’चा धडाकेबाज ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला
2 मिथुन चक्रवर्ती यांची तब्येत बिघडली; चित्रपटाचं शूटिंग थांबवलं
3 इंग्रजी संवादांमुळे ‘फनी बॉय’ चित्रपट ऑस्कर अकादमीने नाकारला
Just Now!
X