06 December 2020

News Flash

अक्षय-कियाराच्या ‘लक्ष्मी’ला झटका, चित्रपट झाला लीक?

चित्रपट वेळेपूर्वी प्रदर्शित झाला, पण...

अखेर ९ नोव्हेंबर रोजी बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षीत ठरलेला 'लक्ष्मी' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला.

गेल्या कित्येक दिवसांपासून प्रेक्षक लक्ष्मी या चित्रपटाची उत्सुकतेने वाट पाहत होते. अक्षय कुमार आणि कियारा अडवाणी यांची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला. डिस्नी प्लस हॉटस्टार या ओटीटीवर ९ नोव्हेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला. मात्र, प्रीमिअरपूर्वीच हा चित्रपट लीक झाल्याचं ‘न्यूज १८.कॉम’च्या वृत्तात नमूद करण्यात आलं आहे.

‘लक्ष्मी’ हा चित्रपट लीक झाला असून अनेक टोरेंट वेबसाइटवर हा चित्रपट एचडी क्वालिटीमध्ये डाउनलोड करता येत असल्याचं सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट संध्याकाळी ७.५ वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. मात्र, प्रेक्षकांची उत्सुकता पाहता तो १ तासआधी म्हणजे ६ वाजताच प्रदर्शित करण्यात आला.

आणखी वाचा- ‘IMDb’वर ‘लक्ष्मी’ अपयशी; सर्वांत कमी रेटिंगच्या यादीत समावेश

या चित्रपटात अक्षय कुमार मुख्य भूमिका साकारत असून त्याने आसिफ ही भूमिका साकारली आहे. तर कियाराने प्रिया ही व्यक्तीरेखा वठविली आहे. लक्ष्मी दाक्षिणात्य चित्रपट कंचनाचा रिमेक असून त्यात अभिनेता, दिग्दर्शक राघव लॉरेन्सने मुख्य भूमिका साकारली आहे.

आणखी वाचा- Laxmii review : प्रेक्षकांची निराशा करणारी ‘लक्ष्मी’

दाक्षिणात्य सुपरस्टार राघव लॉरेन्स दिग्दर्शित लक्ष्मी हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीपासून सातत्याने चर्चेत आला होता. या चित्रपटाला अनेक संकटाचादेखील सामना करावा लागला. या चित्रपटावर लव्हजिहाद, धार्मिक भावना दुखावणे असे अनेक आरोप करण्यात आले होते. त्यासोबतच या चित्रपटाच्या नावावरदेखील आक्षेप घेण्यात आला होता. त्यामुळे ‘लक्ष्मी बॉम्ब’ हे नाव बदलून ‘लक्ष्मी’ हे नवीन नाव ठेवण्यात आलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 10, 2020 9:00 am

Web Title: akshay kumar film laxmii leak online before premiere available for free download in torrent sites ssj 93
Next Stories
1 ‘या’ दोन व्यक्तींमुळे पालटलं अशुतोष राणाचं नशीब; घेतला कलाविश्वात येण्याचा निर्णय
2 ५० रुपयांत पाहता येणार मल्टिप्लेक्समध्ये ‘हे’ चित्रपट
3 ‘ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण’मधील सईला मिळणार जबरदस्त धक्का
Just Now!
X