News Flash

‘खिलाडियों का खिलाडी’मध्ये अक्षय कुमारने ‘द अंडरटेकर’ हरवलं नव्हतं तर…

'खिलाडियों का खिलाडी' या चित्रपटाला २५ वर्षे पूर्ण झालेत. या चित्रपटाच्या आठवणी ताज्या करत अक्षय कुमारने मोठा खुलासा केलाय.

बॉलिवूडचा ‘खिलाडी’ अक्षय कुमारने त्याच्या करियरच्या सुरवातीला एका पेक्षा एक हिट अ‍ॅक्शन चित्रपट दिले आहेत. याच चित्रपटांपैकी एक म्हणजे ‘खिलाडियों का खिलाडी’. या चित्रपटात अक्षयसोबत रेखा आणि रवीना मुख्य भूमिकेत होत्या. हा चित्रपट फेमस झाल्याचं एक कारण म्हणजे यात अभिनेता अक्षय कुमारसोबत डब्लूडब्लूएफ चॅम्पियन रेसलर ‘द अंडरटेकर’ याची फाईट दाखवण्यात आली होती. आज या चित्रपटाला २५ वर्षे पूर्ण झाले आहेत. या चित्रपटाच्या आठवणी ताज्या करत अक्षय कुमारने मोठा खुलासा केलाय.

अक्षय कुमारने त्याच्या ट्विटर अकाउंटवर एक ट्विट शेअर करत हा खुलासा केलाय. या ट्विटमध्ये त्याने लिहिलंय, “ज्यांनी ज्यांनी द अंडरटेकरला हरवलंय त्यांनी त्यांनी हात वर करा..” या ट्विटखाली कोलाज केलेला एक फोटो देखील त्याने जोडलाय. यात ब्रॉक लेसनर, ट्रिपल एच, रोमन रेंस यांच्यासोबत अक्षय कुमारचा सुद्धा हात वर केलेला फोटो आहे. ‘खिलाडियों का खिलाडी’ चित्रपटात अभिनेता अक्षय कुमारने फाईटमध्ये द अंडरटेकरला हरवल्याचं दाखवण्यात आलं होतं. ही पोस्ट शेअर करत अक्षय कुमारने या चित्रपटातलं एक सत्य समोर आणलंय.

ही पोस्ट शेअर करत अक्षय कुमारने लिहिलं, “खिलाडियों का खिेलाडी चित्रपटाला २५ वर्ष पूर्ण झाले. यानिमित्ताने तुम्हा सर्वांना प्रफुल्लित करणारी एक नोट…मजेदार सत्य हे आहे की, या चित्रपटात द अंडरटेकरची भूमिका रेसलर ब्रायन ली याने केली होती.” अशी पोस्ट लिहून ‘खिलाडियों का खिेलाडी’ चित्रपटातलं एक सत्य त्याच्या फॅन्ससमोर उघड केलंय. या चित्रपटात अक्षय कुमारने ज्याला हरवलं होतं तो द अंडरटेकर नसून त्याची भूमिका करणारा रेसलर ब्रायन ली होता.

अक्षय कुमारची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतेय. ही पोस्ट शेअर केल्यानंतर अवघ्या काही तासांमध्येच अडीच लाखांपेक्षा जास्त लोकांनी या पोस्टला लाइक केलं आहे. सोबत त्याच्या पोस्टवर कमेंट्स करत आपल्या प्रतिक्रिया देताना दिसून येत आहेत.

अक्षय कुमारच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर ‘लक्ष्मी’ या चित्रपटातून तो झळकला होता. शिवाय ‘सूर्यवंशी’ आणि ‘बेल बॉटम’ हे दोन्ही चित्रपट रिलीजसाठी तयार आहेत. सोबतच ‘अतरंगी रे’, ‘बच्चन पांडे’, ‘पृथ्वीराज’ आणि ‘राम सेतु’ हे चित्रपट लवकरच रिलीज होतील.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 13, 2021 6:47 pm

Web Title: akshay kumar name include among those who defeated the undertaker post viral prp 93
Next Stories
1 ‘धूम-4’ सिनेमात अक्षय कुमार आणि सलमान खान झळकणार ?; सोशल मीडियावर चर्चांना उधाण
2 सुशांत सिंह राजपूतच्या निधनामुळे ‘द फॅमिली मॅन’च्या जेके तळपदेचं स्वप्न राहिलं अपूर्ण
3 शाहरूख खानचा अनसीन फोटो होतोय व्हायरल; काही वर्षांपूर्वी असा दिसत होता ‘किंग खान’
Just Now!
X