04 March 2021

News Flash

‘आत्महत्या करण्यापूर्वी आई-वडिलांचा विचार करा’ अक्षय कुमारचा जुना व्हिडीओ व्हायरल

सोशल मीडियावर हा व्हिडीओ पुन्हा व्हायरल होत आहे.

रविवारी १४ जून रोजी सुशांत सिंह राजपूतने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याने वयाच्या ३४व्या वर्षी जगाचा निरोप घेल्यामुळे चाहत्यांसोबतच सर्व कलाकारांना धक्का बसला. बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने सोशल मीडिया पोस्टद्वारे सुशांतला श्रद्धांजली वाहिली. आता अक्षयचा एक जुना व्हिडीओ पुन्हा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये अक्षय खूप महत्त्वाचा संदेश देताना दिसत आहे.

बॉम्बे टाइम्सने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर अक्षयचा जुना व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करत त्यांनी, ‘आत्महत्या करणे हा कोणत्याही समस्येवरचा उपाय नाही. इतके खरतनाक आणि मोठे पाऊल उचलताना आपल्या कुटुंबीयांचा आणि मित्रांचा विचार करायला हवा. आपण त्यांना किती दु:ख देणार. या जुन्या व्हिडीओमध्ये अक्षय मेंटल हेल्थ विषयी बोलताना दिसत आहे’ असे कॅप्शन दिले आहे.

अक्षय कुमारने सुशांतच्या निधनानंतर एक ट्विट केले होते. ‘खरं सांगू मला या घटनेने धक्काच बसला आहे आणि माझ्याकडे बोलायला शब्द नाहीत. मला आजही आठवतय मी सुशांत सिंह राजपूतचा छिछोरे पाहत होतो आणि माझा मित्र, चित्रपट निर्माता साजिदला मला चित्रपट आवडल्याचे सांगत होतो. तसेच मी या चित्रपटात काम करायला हवे होते असे साजिदला म्हटले’ असे अक्षयने ट्विटमध्ये म्हटले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 15, 2020 6:47 pm

Web Title: akshay kumar old video goes viral after sushant singh rajput suicide avb 95
Next Stories
1 “आत्महत्या करण्याआधी आई-वडिलांचा विचार करा”; सिद्धार्थचा मोटिव्हेशनल व्हिडीओ व्हायरल
2 “इक वारि फिर से आ”; ‘अमुल’ची सुशांतला अनोखी श्रद्धांजली
3 सुशांतच्या आत्महत्येनंतर नेटकरी करण जोहर आणि आलियावर संतापले; जाणून घ्या कारण काय
Just Now!
X