बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार आणि अभिनेत्री करीना कपूर यांचा नुकताच प्रदर्शित झालेला ‘गुड न्यूज’ हा विनोदीपट सध्या तुफान चर्चेत आहे. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने १७.५० कोटी रुपयांची घसघशीत कमाई केली. समिक्षकांकडूनही या चित्रपटाबाबत मिश्र प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान कर्नाटकातील एका स्वयंसेवी (NGO) संस्थेने ‘गुड न्यूज विरोधात याचिका दाखल केली आहे. हा चित्रपट चुकीच्या माहितीचा प्रसार करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

Photo : गोव्याच्या किनाऱ्यावर अण्णा आणि शेवंताची सफर…

का आरोप केला जात आहे?

‘गुड न्यूज’ या चित्रपटात दोन कुटुंब दाखवण्यात आली आहेत. या दोन्ही कुटुंबांचे आडनाव बत्रा असे आहे. ही दोन कुटुंब इन-विट्रो फर्टिलाइजेशन (IVF) तंत्रज्ञानाच्या मदतीने बाळ मिळवण्यासाठी एका खासगी रुग्णालयात जातात. तेथे त्यांच्या शुक्राणुंची अदलाबदल होते. या कथानकाविरोधात मैसूरमधील ‘येस ट्रस्ट’ नामक एका स्वयंसेवी (NGO) संस्थेने आपला विरोध दर्शवला आहे. या ट्रस्टचे अध्यक्ष मीर समीम रजा यांनी कर्नाटक उच्च न्यायालयात या चित्रपटाविरोधात याचिका दाखल केली आहे.

“इस बार सामने गब्बर हो या शाकाल हम भी देखेंगे”; बिग बींच्या पोस्टवर अनुरागची प्रतिक्रिया

काय आहे याचिकेमध्ये?

हा चित्रपट इन-विट्रो फर्टिलाइजेशन (IVF) बाबत चुकिची माहिती पसरवत आहे. चित्रपटात दाखवल्याप्रमाणे कुठल्याही प्रकारचा असा गोंधळ रुग्णालयात केला जात नाही. आपल्या देशात असेही काही अज्ञानी प्रेक्षक आहेत ज्यांना चित्रपटात घडणारी प्रत्येक गोष्ट खरी वाटते. परिणामी या चित्रपटामुळे प्रेक्षकांच्या मनात IVF बाबत गैरसमज किंवा भीती निर्माण होऊ शकते. असा आरोप ‘गुड न्यूज’विरोधात केलेल्या याचिकेत करण्यात आला आहे.