बॉलीवूडला अनेक हिट चित्रपट देणारी ‘रंगीला गर्ल’ उर्मिला मातोंडकर ही लग्न बंधनात अडकली आहे. काश्मीर स्थित व्यावसायिक आणि मॉडेल मोहसिन अख्तर मिर याच्यासोबत उर्मिलाने लग्नगाठ बांधली. एका हॉटेलमध्ये छोटेखानी समारंभात अगदी मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा झाला. उर्मिला मातोंडकरविषयी तर आपल्याला बरीच माहिती आहे. आता उर्मिलाचा नवरा मोहसिन अख्तरविषयी जाणून घेऊया..
१. ‘टाइम्स ऑफ इंडिया मि. इंडिया २००७ ‘ स्पर्धेमध्ये फ्रेडी दारुवाला याने प्रथम, कवलजीत आनंद सिंघ याने दुसरा तर मोहसिनने तृतीय क्रमांक पटकावला होता.
२. ‘अ मॅन्स वर्ल्ड’मध्ये त्याने सेक्स वर्करची भूमिका साकारली होती.
३. मोहसिनने २१ व्या वर्षी मॉडलिंग करण्यासाठी त्याचे काश्मिरमधील घर सोडले. त्यावेळी त्याने लग्न करावे अशी त्याच्या आईची इच्छा होती. मात्र, मोहसिनने त्याच्या करियरला प्राधान्य दिले.
४. २०११ साली प्रदर्शित झालेल्या ‘मुंबई मस्त कलंदर’ या चित्रपटात त्याने काम केले होते.
५. ‘लक बाय चान्स’ या चित्रपटात त्याने ‘कुणाल’ची व्यक्तिरेखा साकारली होती.
६. डिझाइनर मनिष मल्होत्राकडे त्याने इन-हाउस मॉडेल म्हणून काम केले होते.
७. मोहसिनने तरुण कुमार, मोनिष मल्होत्रा, विक्रम फडणीस, रन्ना गिल या डिझाइनर्ससाठी रॅम्पवॉक केला आहे.
८. मोहसिन उर्मिलापेक्षा जवळपास १० वर्षांनी लहान आहे.
९. प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक ए आर रहमान याच्याही एका अल्बममध्ये मोहसिन झळकला होता.
संग्रहित लेख, दिनांक 4th Mar 2016 रोजी प्रकाशित
जाणून घ्या उर्मिलाचा नवरा मोहसिन अख्तरविषयी..
मोहसिन उर्मिलापेक्षा जवळपास १० वर्षांनी लहान आहे.
Written by लोकसत्ता टीमguravchaitali

First published on: 04-03-2016 at 08:49 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: All you need to know about urmila matondkars husband mohsin akhtar