News Flash

अमित कुमार म्हणाले, “किशोर कुमार स्पेशल एपिसोड मला आवडला नाही…” ; एपिसोड थांबवा !

इंडियन आयडलच्या 'त्या' एपिसोडबाबत अमित कुमार यांचा खुलासा

(Photo: Sony TV/Twitter)

सोनी टीव्हीवरचा सुप्रसिद्ध रिअ‍ॅलिटी शो इंडियन आयडल सीजन १२ मध्ये येत्या रविवारी गायक किशोर कुमार स्पेशल एपिसोड प्रदर्शित केला जाणार आहे. नुकतीच याची शूटिंग पूर्ण झाली आहे. या एपिसोडसाठी किशोर कुमार यांचा मुलगा गायक-दिग्दर्शक अमित कुमार यांना देखील सामिल केलं होतं. परंतू “हा स्पेशल एपिसोड मला बिलकुल आवडला नाही. या एपिसोडमध्ये मला सगळ्या स्पर्धकांचं फक्त कौतूकच करण्यासाठी मला सांगितलं होतं”, असा खुलासा अमित कुमार यांनी केलाय. अमित कुमार यांनी हा खुसाला उघड केल्यानं आधीच नेटकऱ्यांकडून ट्रोल होत असलेल्या या शोच्या पडद्यामागच्या गोष्टी समोर आल्या आहेत.

प्रसिद्ध म्युझिक रिअॅलिटी शो इंडियन आयडल सीझन 12 मध्ये यंदाच्या विकेंडला किशोर कुमार यांना ट्रिब्यूट देण्यासाठी स्पेशल १०० गाण्यांचा एपिसोड प्रदर्शित केला जाणार आहे. यासाठी किशोर कुमार यांचा मुलगा अमित कुमार यांना देखील प्रमुख पाहूणे म्हणून बोलवण्यात आलं होतं. नुकतीच या एपिसोडची शुटिंग ही पूर्ण झाली. या शुटिंगबद्दल आणि पडद्यामागच्या गोष्टी जाणून घेण्यासाठी माध्यमांनी अमित कुमार यांच्याशी संपर्क केला. यावेळी त्यांनी बरेच खुलासे करत पडद्यामागच्या खऱ्याखुऱ्या गोष्टी शेअर केल्या आहेत. गायक- दिग्दर्शक अमित कुमार हे कायम त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी जाणले जातात. त्यामूळे त्यांनी या एपिसोडमधला अनुभव देखील तितक्याच स्पष्टपणे मांडलाय.

या एपिसोडमध्ये नक्की काय झालंय, असं विचारल्यानंतर अमित कुमार म्हणाले, “खरं तर किशोर कुमार यांच्यासारखं कुणीच गाऊ शकत नाही. किशोर कुमार हे व्यक्तिमत्वाने शिखर गाठलेले आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाला अनेक चेहरे असलेले व्यक्ती होते. ‘आराधना’ चित्रपटातलं ‘रूप तेरा मस्ताना’ हे गाणं सोडलं तर आजच्या तरूणांना त्यांच्याबद्दल काहीच माहित नाही.”

यापुढे आणखी खुलासे करताना अमित कुमार म्हणाले, “या एपिसोडमध्ये मला सगळ्या स्पर्धकांचं कौतूकच करण्यासाठी सांगितलं होतं. या एपिसोडमध्ये किशोर कुमार यांना ट्रिब्यूट दिलं जाणार असल्यामूळे स्पर्धक जसंही गाणे गातील त्यांचं प्रोत्सहनच वाढवणाऱ्या प्रतिक्रिया देण्यासाठी सांगितलं होतं. माझ्या वडिलांना श्रद्धांजली देण्यासाठी हा एपिसोड आहे, असं मला आधी वाटलं होतं. परंतू तिथे गेल्यानंतर मला जे काही करण्यासाठी सांगितलं मी फक्त तेच करत गेलो. यासाठी मला तिथे काय काय बोलावं लागेल याची मी एक स्क्रिप्टच त्यांच्याकडे मागितली होती, पण त्यांनी मला ती स्किप्ट देखील दिली नाही.”

अमित कुमार शोमध्ये यासाठी गेले होते…

या शो मध्ये जाण्यामागचं काय कारण होतं, असा प्रश्न केल्यानंतर अमित कुमार म्हणाले, “पैशांची गरज प्रत्येकालाच असते. माझे वडिल सुद्धा पैशांना खूप महत्त्व देत होते. या शोसाठी मी जी किंमत मागितली होती ती देण्यासाठी ते तयार होते. म्हणूनच मी या शोमध्ये गेलो होतो. आणि मी का जाऊ नये या शोमध्ये ? मी सर्व स्पर्धक, जजेस आणि संपूर्ण शोचा खूप आदर करतो. या अशा गोष्टी घडतच असतात आयुष्यात. चित्रपटसृष्टीतही अनेक चित्रपट चांगले असतात तर काही चांगले नसतातही…तसंच अनेक गाणी चांगली असतात तर काही गाणी चांगली नसतात.”

त्यानंतर अमित कुमार यांनी इंडियन आयडल शोच्या मेकर्सना एक सल्लाही दिला. “यापुढे कोणत्याही दिग्गज व्यक्तींना ट्रिब्यूट देणारा एपिसोड तयार करणार असाल तर कृपया अशा पद्धतीने एपिसोड नका करू”, असं ही अमित कुमार म्हणाले.

या ट्रिब्यूट एपिसोडमध्ये शोचे जजेस नेहा कक्कर आणि हिमेश रेशमिया यांनी किशोर कुमार यांचं गाणं चुकीच्या पद्धतीने गायल्यामुळे सध्या ते दोघेही नेटकऱ्यांकडून ट्रोल होत आहेत. यावर अमित कुमार यांची प्रतिक्रीया विचारली असता ते म्हणाले, “हो मला माहितेय, मला हा एपिसोड बिलकुल आवडलेला नाही. हा एपिसोड थांबवावा असं मला वाटतंय.”

इथे पहा नेटकऱ्यांच्या कमेंट्स…

महाराष्ट्रात लॉकडाउनच्या परिस्थितीमुळे इतर शो प्रमाणेच इंडियन आयडल १२ चा ही नवा सेट दमणमध्ये तयार केला गेलाय. या शोमधले सर्व स्पर्धक दमणमध्ये दाखल झाले होते, परंतू विशाल ददलानी, नेहा कक्कर, हिमेश रेशमिया हे दमणमध्ये पोहोचले नसल्याने त्यांच्याजागी अनु मलिक आणि मनोज मुतंशिर यांना जजेच्या खुर्चीवर बसवण्यात आलं होतं. त्यानंतर किशोर कुमार स्पेशल एपिसोडसाठी नेहा कक्कर आणि हिमेश रेशमिया हे दमणमध्ये पोहोचल्यानंतर या शोसाठीची शूटिंग पूर्ण केली आहे. परंतू विशाल ददलानी या शोमध्ये आणखी काही दिवस दिसणार नसल्याचं बोललं जातंय. या स्पेशल शोसाठीची शूटिंग पूर्ण झाल्यानंतर नेहा कक्कर आणि हिमेश रेशमिया हे दोघेही पुन्हा मुंबईत परतले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 11, 2021 1:45 pm

Web Title: amit kumar on the indian idol 12 kishore kumar episode i myself didnt enjoy it i was told to praise all the participants prp 93
Next Stories
1 ‘आई-वडिलांची मदत घेऊ शकत नाही’, कमल हासन यांच्या मुलीवर कोसळलं आर्थिक संकट
2 प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी कायपण!; ‘राधे’च्या रिलीजवर सलमान म्हणाला..
3 वडिलांच्या निधनाबद्दल कळल्यानंतरही ‘आई कुठे काय करते’मधील अभिनेत्याने पूर्ण केलं शूटिंग
Just Now!
X