विद्या बालन स्टारर ‘शेरनी’ हा चित्रपट नुकताच अ‍ॅमेझॉन प्राइमवर रिलीज करण्यात आलाय. वाघ संवर्धन आणि संरक्षणावर आधारित या चित्रपटामध्ये एका वाघिणीला पडकण्यासाठी वन विभागाला येणाऱ्या अडचणी आणि प्राण्यांना मानव जातीकडून मिळत असलेली वागणूक दाखवण्यात आलीय. या चित्रपटाचा शेवट प्राणी संग्रहालयात करण्यात आलाय. या चित्रपटाच्या शेवटच्या सीनबाबत दिग्दर्शक अमित मसुरकर खुल्या मनाने व्यक्त झाले. करोना परिस्थितीमुळे या चित्रपटाच्या शूटिंगसाठी उशीर झालाच, पण त्यामूळे चित्रपटाचा शेवट सुद्धा अनोख्या पद्धतीने करण्यासाठी वेळ देखील मिळाला असल्याचं दिग्दर्शक अमित मसुरकर यांनी सांगितलं. करोनाच्या परिस्थितीलाच आधारून या चित्रपटाचा शेवट करण्यात आलाय.

माणूस आणि प्राण्यांच्या नात्यावर व समाजातील पितृसत्ताक संस्कृतीवर आधारित ‘शेरनी’ हा चित्रपट आहे. यात अभिनेत्री विद्या बालनने एका वन अधिकारीची भूमिका साकारली आहे. हा चित्रपट गेल्या १८ जून रोजी अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर रिलीज करण्यात आलाय. या चित्रपटाचा शेवट सध्या चर्चेत आहे. ‘शेरनी’ चित्रपटाचे दिग्दर्शक अमित मसुरकर यांनी एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत यावर प्रतिक्रिया दिलीय.

Cyber cheater arrested from Madhya Pradesh who cheat music director
संगीत दिग्दर्शकाची सायबर फसवणूक करणाऱ्याला मध्य प्रदेशातून अटक, सायबर पोलिसांची कारवाई
The Kerala Story screening in church
‘लव्ह जिहाद’चं कारण देत विद्यार्थ्यांना दाखवला ‘द केरला स्टोरी’ चित्रपट; केरळच्या चर्चमधला प्रकार!
crew movie review by loksatta reshma raikwar
Crew Movie Review : रंजक सफर
juna furniture teaser released by salim khan
ज्येष्ठ नागरिकांचा सहानुभूतीने विचार करायला हवा

करोना परिस्थितीमुळे ‘शेरनी’ या चित्रपटाच्या शूटिंगसाठी उशीर झाला होता. या चित्रपटाचं सर्व काम ठप्प झालं होतं. पण यातली एक चांगली गोष्ट म्हणजे चित्रपटाचा शेवट आणखी अनोख्या पद्धतीने करण्यासाठी टीमला वेळ देखील मिळाला. सध्याची करोना परिस्थिती पाहता चित्रपट पाहिल्यानंतर प्रेक्षकांना परिस्थितीचं भान कळेल असा शेवट केला पाहीजे, अंस चित्रपटाच्या टीम मेंबर्सच्या मनात आलं.

‘न्यूटन’ आणि ‘सुलेमानी कीडा’ फेम दिग्दर्शक अमित मसुरकर म्हणाले, “जर मानव जातीने प्राण्यांसाठीची वागणूक बदलली नाही तर भविष्यात होणाऱ्या भयाहव परिस्थितीच्या चित्रांनी चित्रपटाचा शेवट केला पाहीजे, असा विचार करून लेखिका आस्था टीकू यांनी अनोखी कल्पना दिली. या समस्येवर उपाय शोधणं अवघड आहे. प्राणी संवर्धनाचा संदेश देणाऱ्या या चित्रपटात शेवटी प्रेक्षकांना एक प्रश्न विचारण्यात आलाय. आपण सर्व स्वतःसोबत आणि इतरांसोबत नक्की कसं वागतोय, हा प्रश्न प्रेक्षकांना विचारण्यात आलाय.”

चित्रपटाच्या लेखिकेने दिली होती कल्पना

दिग्दर्शक अमित मसुरकर म्हणाले, “सुरवातीला ड्राफ्टमध्ये चित्रपटाचा शेवट हॅपी एंडीग ठेवण्यात आला होता. पण त्यानंतर करोना परिस्थिती निर्माण झाली. यामुळे आम्हाला चित्रपटात आणखी काय चांगलं करता येईल यावर विचार करण्यासाठी वेळ मिळाला. या चित्रपटाचा शेवट वेक अप कॉलने करायचा अशी कल्पना लेखिका आस्थाने दिली. यासाठी मुंबईतल्या संग्रहालयात टॅक्सिडरमीचं सेक्शन एकदा पाहिलं होतं. पण ही जागा शूटिंगसाठी योग्य नसल्याचं वाटलं.”

हा चित्रपट तयार करण्याची कल्पना सुद्धा लेखिका आस्था टिकू यांची होती. याच्या चित्रपटात अभिनेत्री विद्या बालनसोबत अभिनेता विजय राज, बृजेन्द्र काला, शरत सक्सेना, नीरज कबी, इला अरुण, मुकुल चड्ढा हे सुद्धा झळकणार आहेत. या सगळ्या कलाकारांसोबत काम करण्याची संधी मिळाल्यानं मी भाग्यवान असल्याचं दिग्दर्शक अमित मसुरकर यांनी म्हटलंय.