सध्या सोनी चॅनेलवर ‘कौन बनेगा करोडपति ११’ सुरु आहे. या शोच्या सूत्रसंचालनाची धूरा बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या खांद्यावर देण्यात आली आहे. शोमध्ये अमिताभ स्पर्धकांच्या आयुष्यातील गुपितं सर्वांसमोर उघड करताता. दरम्यान त्यांनी त्यांच्या आयुष्यातील काही किस्से सुद्धा सांगितले आहेत.

बुधवारी अमिताभ यांनी शोमध्ये ते दिल्लीला शिक्षण घेत असतानाचा एक किस्सा सांगितला आहे. कॉलेजचे शिक्षण घेत असताना अमिताभ दिल्लीमधील तीन मूर्ती येथे राहत होते आणि कॉलेजला जाण्यासाठी त्यांना बसने प्रवास करावा लागत असे. ही बस कनॉटप्लेस (सीपी) मार्गाहून त्यांना यूनिवर्सिटीला सोडत असे. ‘या रस्त्यात खासकरुन सीपीपासून आयपी कॉलेजपर्यंत, मिरांडा हाउसला जाणाऱ्या सुंदर कॉलेजच्या मुली बसमध्ये चढत असत. आम्ही या बसस्टॉपवर सुंदर मुलींची बसमध्ये चढण्याची वाट पाहात असे’ असे अमिताभ यांनी सांगितेल.

आणखी वाचा : ‘प्रभासची भेटू घालून द्या नाहीतर…’ चाहत्याची शोले स्टाइल नौ’टंकी’

काही वर्षांनंतर माझे पदवीधर शिक्षण पूर्ण झाले आणि मी नोकरी करु लागलो. दरम्यान माझी ओळख त्या बसमध्ये चढणाऱ्या सुंदर मुलीशी झाली. त्या मुलीनी मला एक मजेदार गोष्ट सांगितली. ‘जेव्हा तुम्ही यूनिवर्सिटीमधून शिक्षण घेत होते त्यावेळी तुमची एक झलक पाहण्यासाठी आम्ही वाट पाहात बसायचो. ती दररोज तिचा मित्र प्राणसह मला पाहण्यासाठी त्या बसस्टॉपवर येत असे. माझी वाट पाहत असे’ अमिताभ पुढे म्हणाले.