27 January 2021

News Flash

#BadlaTrailer : ‘पिंक’नंतर पुन्हा एकदा तापसीला वाचवणार बिग बी, पहा रहस्यमयी ट्रेलर

अखेरपर्यंत हा ट्रेलर खिळवून ठेवतो. 

बदला

‘पिंक’ या सामाजिक मुद्द्यावर समर्पकपणे भाष्य करणाऱ्या चित्रपटानंतर पुन्हा एकदा अमिताभ बच्चन आणि तापसी पन्नू ही जोडी एकत्र झळकत आहे. सुजॉय घोष दिग्दर्शित या चित्रपटाचं नाव ‘बदला’ असं असून त्याचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे.

‘बदला लेना हर बार सही नही होता, लेकीन माफ कर देना भी हर बार सही नही होता,’ अशा भारदस्त बिग बींच्या आवाजाने या ट्रेलरची सुरुवात होते. या चित्रपटात बिग बी पुन्हा एकदा वकीलाच्या भूमिकेत आहे. तापसीला एका खूनाच्या गुन्ह्यात अडकण्यापासून ते वाचवण्याचा प्रयत्न करणार आहेत. अत्यंत गूढ आणि रहस्यमयी अशी चित्रपटाची कथा असल्याचं ट्रेलर पाहून लक्षात येतं. त्यातच ‘कहानी’सारख्या चित्रपटाचे दिग्दर्शक सुजॉय घोष याचं दिग्दर्शन करत असल्याने चित्रपटातून फार अपेक्षा आहेत. अखेरपर्यंत हा ट्रेलर खिळवून ठेवतो.

शाहरुख खानच्या रेड चिलीज एंटरटेन्मेंटने अजूर एंटरटेन्मेंटसोबत मिळून या चित्रपटाची निर्मिती केली आहे. ‘पिंक’मधील बिग बी आणि तापसीच्या भूमिकेची प्रेक्षक-समीक्षकांकडून प्रशंसा झाली होती. त्यामुळे या चित्रपटासाठीही प्रेक्षक उत्सुक आहेत.

‘बदला’ हा क्राइम- थ्रिलर चित्रपट असणार आहे. त्याची पटकथा लिहिण्यास दहा वर्षांचा काळ लागला असं समजतंय. याची बरीचशी शूटिंग परदेशात झाली आहे. येत्या ८ मार्च रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 12, 2019 1:10 pm

Web Title: amitabh bachchan and taapsee pannu starrer badla trailer released directed by sujoy ghosh
Next Stories
1 हिमांशूसोबत ब्रेकअपनंतर नेहाची प्रसारमाध्यमांना विनंती
2 संगीताच्या दुनियेतला बादशहा चित्रपटसृष्टीत करणार पदार्पण
3 खलनायकीचा प्राण
Just Now!
X