बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. ऑनलाईन ब्लॉग्स, ट्विट, फोटो आणि व्हिडीओजच्या माध्यमातून ते कायम चर्चेत असतात. मात्र यावेळी अमिताभ आपले वडिल हरिवंशराय बच्चन यांच्यामुळे चर्चेत आहेत. पोलंडमधील एका रस्त्याचं नाव ‘हरिवंशराय’ ठेवलं जाणार आहे. बिग बींनी स्वत: ट्विट करुन ही आनंदाची बातमी आपल्या चाहत्यांना दिली.

अवश्य पाहा – “जातिनिहाय आरक्षण बंद करा”; कंगना रणौतची सरकारकडे मागणी

अवश्य पाहा – “माफी माग अन्यथा मानहानिचा दावा ठोकेन”; महेश भट यांच्या सुनेला अमायराचा इशारा

”प्रबिसि नगर कीजे सब काजा. हृदयं राखि कोसलपुर राजा.’ ~ रामचरितमानस , सुंदर कांड. भावार्थ – अयोध्यापुरीचे राजा श्री रघुनाथजी यांना हृदयात ठेवून नगरात प्रवेश करा. तुमच्या सर्व मनोकामना पुर्ण होतील.” अशा आशयाचं ट्विट करुन अमिताभ बच्चन यांनी या सन्मानासाठी पोलंड सरकारचे आभार मानले आहेत. त्याचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

अमिताभ यांचे वडिल श्री. हरिवंशराय बच्चन एक उत्तम कवी होते. त्यांच्या कविता भारतातच नव्हे तर युरोप अमेरिकेतही तितक्याच आवडीने वाचल्या जातात. पोलंडमध्ये हरिवंशराय यांच्या नावानं आजवर अनेकदा काव्यसंमेलनही भरवण्यात आली आहेत. अलिकडेच त्यांच्यासाठी पोलंडमधील एका चर्चमध्ये प्रार्थना देखील करण्यात आली होती. या प्रार्थनेचे फोटो बिग बींनी ट्विट केले होते. दरम्यान अमिताभ यांच्यासोबतच त्यांच्या संपूर्ण कुटुंबियांनी या सन्मानासाठी पोलंड सरकारचे आभार मानले आहेत.