08 December 2019

News Flash

अमिताभ बच्चन यांची आवडती अभिनेत्री कोण माहितीये?

ही अभिनेत्री आवडण्यामागचं कारणही त्यांनी सांगितलं आहे

अमिताभ बच्चन

छोट्या पडद्यावरील ‘कौन बनेगा करोडपती’ अर्थात ‘केबीसी’ या शोचं अभिनेता अमिताभ बच्चन सूत्रसंचालन करत आहेत. या शोमध्ये अनेक वेळा बिग बी त्यांच्या आयुष्याशी निगडीत गोष्टींचा खुलासा करत असतात. यावेळीदेखील त्यांनी अशाच एका गोष्टीचा खुलासा केला आहे. बिग बींनी त्यांना आवडणाऱ्या अभिनेत्रीचं नाव सर्वांसमोर जाहीर केलं आहे.

नुकत्याच झालेल्या केबीसीच्या भागामध्ये स्पर्धकाला ‘राजी’ चित्रपटाविषयी काही प्रश्न विचारण्यात आले होते. यावेळी स्पर्धकाने अभिनेत्री आलिया भट प्रचंड आवडत असल्याचं सांगितलं. त्यावर अमिताभ यांनीही त्यांना आलियाच आवडत असल्याचं सांगितलं.

‘आताच्या स्टारकिडमध्ये आलिया भट मला विशेष आवडते. आम्ही ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटामध्ये स्क्रीन शेअर करत आहोत. तिच्या अभिनयाचं एक वैशिष्ट्य आहे, ती कॅमेरासमोर अगदी सहज समोरी जाते. कॅमेरासमोर तिचे एक्सप्रेशन्सदेखील सहज असतात. त्यामुळे मला एक गोष्ट जाणवली की आताचे नवोदित कलाकार कोणतेही ओव्हर अॅक्टींग न करता सहज अभिनय करुन प्रेक्षकांची मन जिंकतात’, असं बिग बी म्हणाले.

दरम्यान, अयान मुखर्जी यांच्या ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटात अमिताभ बच्चन, आलिया भट आणि रणबीर कपूर यांची मुख्य भूमिका आहे. हा चित्रपट २०२० रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची शक्यता आहे. या चित्रपटामध्ये आलिया आणि रणबीर पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेअर करणार आहेत.

 

First Published on October 9, 2019 2:11 pm

Web Title: amitabh bachchan really admires this modern day actress ssj 93
Just Now!
X