News Flash

नाइलाज म्हणून शर्टाला बांधली गाठ, चाहत्यांनी फॅशन समजून केली कॉपी

अमिताभ यांनी 'दीवार' या चित्रपटातील हा फोटो शेअर केल्यानंतर चाहत्यांनी सोशल मीडियावर त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

amitabh bachchan shares story behind knotted shirt look in deewar
अमिताभ यांचा हा फोटो 'दीवार' चित्रपटातील आहे.

बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. अमिताभ सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहतात. नुकताच त्यांनी एक थ्रोबॅक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. एवढंच नाही तर त्यांनी त्या फोटो मागची कहाणी देखील सांगितली आहे.

अमिताभ यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा फोटो शेअर केला आहे. या फोटोत अमिताभ यांनी निळ्या रंगाचा शर्ट परिधान केला आहे. “ते काय दिवस होते मित्रांनो..आणि हा गाठ मारलेला शर्ट..त्याची पण एक कहाणी आहे..शूटचा पहिला दिवस..शॉट रेडी..चित्रीकरणाला सुरुवात होणार..तर हा शर्ट खूप लांब निघाला..गुडघ्यांच्या खाली जात होता..दिग्दर्शक दुसऱ्या शर्टाची वाट पाहू शकत नव्हते.. म्हणून त्या शर्टाला गाठ बांधली आणि..”, अशा आशयाचे कॅप्शन त्यांनी दिले आहे.

आणखी वाचा : ‘तारक मेहता…’मधील नवीन सोनू कोणाला आवडत नव्हती, गोलीने केला खुलासा

 

View this post on Instagram

 

A post shared by Amitabh Bachchan (@amitabhbachchan)

आणखी वाचा : Video : जान्हवीने हातात चप्पल पकडून मित्र-मैत्रिणींसोबत केला डान्स

अमिताभ यांची ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. त्यांच्या या पोस्टवर त्यांच्या चाहत्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी कमेंट करत त्यांच्या या लूकला कॉपी केल्याचे म्हटले आहे. कॉमेडियन सुनील ग्रोव्हर म्हणाला, ‘आम्ही सर्वांनी हा लूक कॉपी केला.’ दरम्यान, अमिताभ सध्या ‘कौण बनेगा करोडपती १३’च्या चित्रीकरणात व्यस्त आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 22, 2021 12:33 pm

Web Title: amitabh bachchan shares story behind knotted shirt look in deewar dcp 98
Next Stories
1 अविका गौरने ‘सिक्रेट चाइल्ड’ वर दिली ही प्रतिक्रिया; म्हणाली, “ते माझ्या वडिलांच्या वयाचे आहेत…”
2 शाहरुख खानच्या लेकीने शेअर केला जिममधील हॉट फोटो, सुहानाचा फोटो पाहून चाहते घायाळ
3 कॉटन साडी…गॉगल्स आणि शूज; रशियाच्या रस्त्यांवर तापसीचा हटके लूक