22 November 2019

News Flash

चुकीची स्पेलिंग लिहिल्यामुळे अनन्या झाली ट्रोल

अनन्याने ती पोस्ट हटवली आणि फोटोचे कॅप्शन सुधारुन तोच फोटो पुन्हा पोस्ट केला.

दिग्दर्शक, निर्माता करण जोहरच्या ‘स्टुडंट ऑफ द इअर २’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री म्हणजे अनन्या पांडे. अनन्या नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आता अनन्या सोशल मीडियावर फोटो शेअर करताना चुकीची स्पेलिंग लिहिल्यामुळे ट्रोल झाली आहे.

अनन्याने नुकताच तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये अनन्या सुहाना खान आणि शनाया कपूर यांच्यासह पोझ देत आहे. तिघीही या फोटोमध्ये अत्यंत ग्लॅमर अंदाजात दिसत आहेत. परंतु अनन्याने फोटो शेअर करत एक कॅप्शन दिले होते. त्या कॅप्शनमध्ये ‘Charlie’s Angels’ च्या जागी ‘Charlie’s Angles’ असे लिहिले होते. काही वेळातच अनन्याचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि चुकीच्या स्पेलिंगमुळे नेटकऱ्यांनी अनन्याला ‘खूप हुशार’ असे म्हणत ट्रोल केले आहे.

काही वेळातच अनन्याला तिच्या चुकीची जाणीव झाली. तिथे लागलीच ती पोस्ट हटवली आणि फोटोचे कॅप्शन सुधारुन तोच फोटो पुन्हा पोस्ट केला. परंतु तो पर्यंत नेटकऱ्यांनी स्क्रीनशॉट काढून ट्रोल केले होते.

सध्या अनन्या तिचा आगामी चित्रपट ‘पती पत्नी और वो’ च्या रिमेकमध्ये व्यग्र आहे. या चित्रपटात अनन्यासह कार्तिक आर्यन मुख्य भूमिकेत दिसणार असून अभिनेत्री भूमि पेडणेकर देखील दिसणार आहे.

First Published on July 11, 2019 3:11 pm

Web Title: ananya panday gets trolled for spelling error in her latest post on instagram avb 95
Just Now!
X