News Flash

Video : अनिकेत विश्वासरावच्या सासूचा भन्नाट डान्स; सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

त्यांचा हा डान्स पाहून अनेकजण कौतुक करत आहेत.

Video : अनिकेत विश्वासरावच्या सासूचा भन्नाट डान्स; सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

सोशल मीडियावर कधी कोणता व्हिडीओ व्हायरल होऊ लागेल याचा नेम नाही. डान्सचे बरेचसे व्हिडीओ आपण सोशल मीडियावर पाहतो. पण त्यातील ठराविक आपलं लक्ष वेधून घेतात. असाच एक डान्सचा व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. अभिनेता अनिकेत विश्वासरावच्या सासूचा हा व्हिडीओ आहे. अनिकेतची पत्नी स्नेहा हिने तिच्या इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.

स्नेहाने तिच्या आईचा व्हिडीओ पोस्ट करत कॅप्शनमध्ये लिहिलं, ‘कोण म्हणेल की ही माझी आई आहे. माझ्यापेक्षा दहापटीने अधिक ऊर्जा आणि उत्साह तिच्यात आहे.’ ‘स्त्री’ चित्रपटातील ‘मिलेगी मिलेगी’ या गाण्यावर अनिकेची सासू डान्स करताना पाहायला मिळतेय. त्यांचा हा डान्स पाहून अनेकजण कौतुक करत आहेत.

गेल्या वर्षी अनिकेत व स्नेहा लग्नबंधनात अडकले. हे दोघं ‘हृद्यात वाजे समथिंग समथिंग’ या चित्रपटात एकत्र झळकले होते. या चित्रपटातील त्या दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप भावली होती. यापूर्वी अनिकेत बऱ्याच मालिका आणि चित्रपटांतून झळकला आहे. तर स्नेहासुद्धा स्वप्नील जोशीच्या ‘लाल इश्क’ या चित्रपटातून झळकली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 18, 2019 4:22 pm

Web Title: aniket vishwasrao mother in law enthusiastic dance watch video ssv 92
Next Stories
1 अमृता खानविलकर सुरू करणार स्वत:चा व्यवसाय
2 अर्जुन रामपालच्या गर्लफ्रेंडला पूत्ररत्न
3 Video : अभिमानाने उर भरुन येणारा ‘मिशन मंगल’चा ट्रेलर पाहिलात का ?
Just Now!
X