News Flash

सुशांतच्या निधनाला एक वर्ष पूर्ण; अंकिता म्हणाली, “अंतराने काही फरक पडत नाही, कारण एक दिवस….”

दहा दिवसांच्या ब्रेकनंतर सुशांतच्या पुण्यतिथीच्या एक दिवस आधी अंकिता तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर पुन्हा सक्रिय झाली.

(Photo: Sushant Singh Rajput/Facebook)

बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या अकाली निधनाने फक्त त्याचे कुटूंबिय नव्हे तर त्याच्या फॅन्सनाही मोठा धक्का बसला होता. याच धक्क्यातून सावरण्यासाठी अभिनेत्री अंकिता लोखंडेला बराच वेळ लागला. परंतू सुशांतच्या एक्झिटला एक वर्ष पूर्ण झाले असतानाच पुन्हा तिच्या मनात सुशांतच्या आठवणी पुन्हा घर करू लागल्या आहेत. सुशांतच्या पुण्यतिथीच्या एक दिवस आधी अंकिता लोखंडे तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर सक्रिय झालीय.

अभिनेत्री अंकिता लोखंडे नेहमीच तिच्या सोशल मिडियावर सक्रिय असायची. काही ना काही पोस्ट शेअर करत ती चाहत्यांसोबत संपर्कात असायची. मात्र, काही दिवसांपूर्वीच अंकिता लोखंडेने सोशल मीडियावरून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर सुशांतच्या मृत्यूला उद्या एक वर्ष पूर्ण होणार आहे. दहा दिवसांच्या ब्रेकनंतर सुशांतच्या पुण्यतिथीच्या एक दिवस आधी अंकिता तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर पुन्हा सक्रिय झाली. तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने समुद्र किनारी उभी असलेला एक फोटो देखील शेअर केलाय. हा फोटो शेअर करताना तिने एक इमोशनल कॅप्शन लिहिली आहे. तिने लिहिलेल्या या कॅप्शनवरून अंकिता अजुनही सुशांतला विसरू शकली नसल्याचं बोललं जातंय.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ankita Lokhande (@lokhandeankita)

अंकिताने लागोपाठ दोन वेगवेगळे फोटोज तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. यात ती एका समुद्र किनारी उभी राहून वर आकाशाकडे बघत असलेली दिसून आली. जणू काही अंकिता आकाशातल्या आसमंतात सुशांतला पाहून काही तरी बोलण्याचा प्रयत्न करतेय, असा अंदाज लावण्यात येतोय.

या फोटोंमध्ये ती लाल रंगाचं जॅकेट आणि लोअरमध्ये दिसून आली. तिचे हे दोन्ही फोटोज चाहत्यांना खूपच आवडले आहेत. मात्र, फोटोसोबत लिहिलेली इमोशनल कॅप्शन चाहत्यांचं लक्ष वेधून घेतेय. आकाशाकडे पाहत असतानाचे फोटो शेअर करत अंकिताने कॅप्शन मध्ये लिहिलंय की, “अंतरानं काही फरक पडत नाही, कारण दिवस संपेपर्यंत आपण सर्व एकाच आकाशाखाली आहोत.” तिने लिहिलेल्या या कॅप्शनवरून अंकिताच्या मनात सुशांतच्या आठवणी अजुनही ताज्या आहेत, असा तर्क लावला जातोय.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ankita Lokhande (@lokhandeankita)


अंकिता लोखंडे आणि सुशांत सिंह राजपूत हे दोघेही ‘पवित्र रिश्ता’ मालिकेतून घराघरात पोहोचले आणि त्यांची जोडी प्रेक्षकांमध्ये खूपच लोकप्रिय झाली होती. दोघांची ऑनस्क्रीन केमेस्ट्री उत्तम होतीच, परंतु खऱ्या आयुष्यतही ते एकमेकांच्या प्रेमात होते. जवळजवळ ६ वर्षे दोघे रिलेशनशीपमध्ये होते. परंतु त्यांचे २०१६ मध्ये ब्रेकअप झाले. त्यानंतर २०२०२ मध्ये सुशांतचा संशयास्पद मृत्यू झाला.

 

सुशांतसोबत ब्रेकअपनंतरही दुःखात होती अंकिता

अंकिताने एका मुलाखतीमध्ये सांगितले की, तिच्या आणि सुशांतच्या नात्यामध्ये तणाव आला होता. त्यामुळेच त्यांनी ब्रेकअप करण्याचा निर्णय घेतला. हा त्यांचा दोघांचा निर्णय होता. अंकिताने सांगितले, ‘ सुशांतने त्याच्या करीअरला निवडले आणि तो आयुष्यात पुढे निघून गेला. परंतु आमच्या ब्रेअकअप नंतर माझ्या आयुष्यातील पुढचे दीड वर्षे खूप वेदनादायी होते.’ सुशांतच्या मृत्यूचा तपास सीबीआय करत आहे. तसेच त्याच्या मृत्यू संदर्भात ड्रग्जची केसही जोडली गेली असून देशातील एकूण पाच मोठ्या संस्था त्याच्या मृत्यूचा तपास करत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 13, 2021 11:07 pm

Web Title: ankita lokhande became active on social media just before the first anniversary of sushant singh rajput shares photos on instagram prp 93
Next Stories
1 VIDEO : जेव्हा सुपरस्टार रजनीकांत यांना पहिल्यांदा भेटला होता सुशांत सिंह राजपूत…; अशी होती ‘थलाइवा’ची प्रतिक्रिया
2 ‘खिलाडियों का खिलाडी’मध्ये अक्षय कुमारने ‘द अंडरटेकर’ हरवलं नव्हतं तर…
3 ‘धूम-4’ सिनेमात अक्षय कुमार आणि सलमान खान झळकणार ?; सोशल मीडियावर चर्चांना उधाण
Just Now!
X