News Flash

अंशुमनच्या संगीतमय प्रवासाला सुरुवात

'सिंगिंग स्टार' या कार्यक्रमात अभिनेता आणि गायक अशा जोड्या स्पर्धक म्हणून सहभागी होणार आहेत.

अंशुमन विचारे आणि जुईली जोगळेकर

सोनी मराठी वाहिनीवर २१ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या ‘सिंगिंग स्टार’ या कार्यक्रमात अभिनेता आणि गायक अशा जोड्या स्पर्धक म्हणून सहभागी होणार आहेत. याच जोड्यांमध्ये एक जोडी आहे अंशुमन विचारे आणि जुईली जोगळेकर. अंशुमनला सर्वांनी विनोदी अभिनय करताना पाहिलं आहे. पण अंशुमनला गायनसुद्धा प्रचंड आवडतं. सोनी मराठी वाहिनीवरील सिंगिंग स्टार या कार्यक्रमामुळे त्याला गाणं शिकण्याची संधी मिळणार असून त्याच्या या संगीतमय प्रवासात अंशुमनची साथ देणार आहे गायिका जुईली जोगळेकर. जुईली नव्या पिढीची युवा गायिका आहे. तिचे सोशल मीडियावर देखील खूप फॉलोअर्स असून तिचं युट्यूब चॅनेल देखील आहे.

अंशुमन आणि जुईलीची चांगलीच गट्टी जमली असून जुईली अंशुमनला दादा म्हणते तर अंशुमन सुद्धा तिला लाडाने तायडी म्हणतो. या जोडीने रियाजाला सुरुवात केली असून दोघंही स्पर्धेसाठी सज्ज होत आहेत.

‘सिंगिंग स्टार’ हा गाण्यांचा कार्यक्रम अतिशय भव्यदिव्य स्वरूपात सादर होणार आहे. संगीतातले दिग्गज सलील कुलकर्णी, बेला शेंडे आणि अभिनेते प्रशांत दामले हे या स्पर्धेचे परीक्षक आहेत. तर छोट्या पडद्यावरचा ग्लॅमरस चेहरा म्हणजेच ऋता दुर्गुळे या कार्यक्रमाचं सूत्रसंचलन करणार आहे. २१ ऑगस्टपासून ‘सिंगिंग स्टार’ हा कार्यक्रम शुक्रवार-शनिवार रात्री ९ वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 17, 2020 8:16 pm

Web Title: anshuman vichare and juili joglekar in singing star reality show ssv 92
Next Stories
1 दिग्दर्शक निशिकांत कामत यांच्या निधनाने कलाविश्वात हळहळ
2 दिग्दर्शक केदार शिंदे आणणार ‘श्रीयुत गंगाधर टिपरे’चा पुढचा पार्ट?
3 फ्लॅटच्या EMI बद्दल स्पष्टीकरण दिल्यानंतर अंकिता प्रियकर विकीबद्दल म्हणाली, ‘तूच माझा…’
Just Now!
X