30 September 2020

News Flash

अनुपम खेर यांच्या आईसह कुटुंबातील तीन जणांना करोनाची लागण

ट्विटरवर व्हिडीओ पोस्ट करत त्यांनी यासंदर्भातील माहिती दिली.

अभिनेते अनुपम खेर यांच्या आईसह कुटुंबातील तीन जणांना करोनाची लागण झाली आहे. ट्विटरवर व्हिडीओ पोस्ट करत त्यांनी यासंदर्भातील माहिती दिली. अनुपम खेर यांची आई दुलारी यांना करोनाची सौम्य लक्षणं असून कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तर अनुपम खेर यांचे भाऊ राजू खेर, वहिनी व पुतणी यांचाही करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. या तिघांनाही सौम्य लक्षणं असल्याचं त्यांनी सांगितलं. अनुपम खेर यांनी स्वत: करोनाची चाचणी केली असून त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे.

“गेल्या काही दिवसांपासून माझ्या आईला भूक लागत नव्हती, काहीच खात नव्हती, दिवसभर झोपून राहत होती. म्हणून आम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यांच्या रक्ताची चाचणी केली. रक्ताचा रिपोर्ट नॉर्मल होता. त्यानंतर डॉक्टरांनी आम्हाला त्यांचा सिटीस्कॅन करायला सांगितला. सिटीस्कॅनमध्ये त्यांना करोनाची लागण झाल्याचं समजलं. त्यानंतर लगेचच मी आणि माझ्या भावाने सिटीस्कॅन केला. त्यात माझा रिपोर्ट निगेटिव्ह आला आणि भावाचा पॉझिटिव्ह आला. भावाच्या कुटुंबीयांचीही चाचणी करण्यात आली. त्यात वहिनी आणि पुतणीलाही करोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं. आईला कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून माझ्या भावाला आणि त्याच्या कुटुंबीयांना क्वारंटाइन करण्यात आलं आहे. मी मुंबई महानगरपालिकेला याबद्दलची माहिती दिली असून ते उत्तमरित्या त्यांचं काम करत आहेत. मी तुम्हालासुद्धा सांगू इच्छितो की घरात जर कोणाला भूक लागत नसेल तर त्यांची करोना चाचणी करून घ्या. कारण मी फार वेळ विचार करत होतो की भूक का लागत नाहीये. डॉक्टरसुद्धा त्यांचं काम खूप चांगल्या पद्धतीने करत आहेत”, असं त्यांनी या व्हिडीओत म्हटलंय.

दुसरीकडे शनिवारी रात्री अमिताभ बच्चन यांना नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांना करोनाची लागण झाली असून सौम्य लक्षणं आहेत. अमिताभ बच्चन यांच्यासोबत अभिषेकचाही करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. या दोघांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 12, 2020 11:07 am

Web Title: anupam kher mother brother sister in law and niece test positive for coronavirus ssv 92
Next Stories
1 …म्हणून BMC ने मानले अभिषेकचे आभार
2 बिग बींमध्ये करोनाची सौम्य लक्षणे; नानावटी रुग्णालयाची माहिती
3 अग्रिमा जोशुआला बलात्काराची धमकी; कारवाईची मागणी करताना अभिनेत्री म्हणाली, “महाराष्ट्रातील स्त्री म्हणून…”
Just Now!
X