विश्वचषकातील पराभवानंतर भारतीय क्रिकेट संघात मतभेद सुरू असल्याच्या जोरदार चर्चा आहेत. भारतीय संघाचा सलामीचा फलंदाज रोहित शर्मा आणि कर्णधार विराट कोहली यांच्यातही वितुष्ट निर्माण झाले आहे. रोहितने विराटला सोशल मीडियावर अनफॉलो केल्यानंतर आता त्याने विराटची पत्नी व अभिनेत्री अनुष्का शर्मालाही अनफॉलो केल्याचं समजतंय. रोहितने अनुष्काला अनफॉलो केल्यानंतर तिने इन्स्टाग्रामवरील स्टोरीमध्ये एक पोस्ट लिहिली आहे.
‘खोट्या देखाव्याच्या गोंधळात फक्त सत्यच शांततेशी हात मिळवू शकते,’ अशी पोस्ट अनुष्काने लिहिली आहे. वर्ल्डकपनंतर भारतीय संघात फूट पडली असल्याची चर्चा आहे. रोहित शर्मा आणि अन्य काही खेळाडूंनी विराट आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्या निर्णयांवर नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर, विराट आणि रोहित यांच्यात वाद झाले असल्याचा दावा करण्यात येत आहे.
रोहितने जरी विराटला अनफॉलो केलं असलं तरी विराट अजूनही इन्स्टाग्रामवर रोहित व त्याची पत्नी रितिका सजदेहला फॉलो करत आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on July 26, 2019 1:33 pm