क्रिकेटर विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा दोघंही सध्या आपल्या कामात व्यग्र असतात. अनेक दिवस ते एकमेकांना भेटतही नाहीत. पण तरीही हे दोन प्रेमी युगुल वेळात वेळ काढून एकमेकांना भेटायला नक्की जातात. नुकतेच या दोघांना दिल्लीमध्ये पाहण्यात आले. सध्या सोशल मीडियावर विरुष्काचे दिल्लीमधील फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
या फोटोंमध्ये विराटने पांढऱ्या रंगाचे टी- शर्ट घातले आहे तर अनुष्कानेही पांढरे टी-शर्ट आणि काळ्या रंगाची पँट घातली होती. विरुष्का दिल्ली येथील ब्रिटीश उच्चायोगमध्ये गेले होते.
सध्या अनुष्का यश राज फिल्म्सच्या सुई धागा सिनेमाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. या सिनेमात तिच्यासोबत वरुण धवनची मुख्य भूमिका आहे. यानंतर ती आनंद एल. रायच्या झीरो सिनेमातही दिसणार आहे. या सिनेमात ती शाहरुख खानसोबत पुन्हा एकदा स्क्रीन शेअर करणार आहे.
विराट कोहलीही लवकरच आयपीएलच्या रॉयल चॅलेंजर्स बँगलोर टीमसोबत सराव सुरू करेल.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on April 1, 2018 6:22 pm